आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबईनं बाजी मारली असली तरी, यंदाच्या हंगामात चलती होती ती विदेशी खेळाडूंचीच.
आयपीएलच्या बाराव्या हंगामात अगदी अटीतटीच्या सामन्यात मुंबईनं चेन्नईला केवळ एका धावानं मात देत चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. मात्र असे असले तरी, यंदाच्या आयपीएलमध्ये चलती होती ती विदेशी खेळाडूंचीच. जवळ जवळ सगळे विक्रम हे विदेशी खेळाडूंच्या नावावर आहे.
सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत यंदारी डेव्हिड वॉर्नरची चलती आहे. यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी डेव्हिड वॉर्नरचं ठरला. वॉर्नरनं 12 सामन्यात 692 धावा केल्या आहेत. तर, भारताचा केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इमरान ताहीर हा यंदाच्या हंगामात सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यानं 17 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. एवढचं नाही तर, तो पर्पल कॅप जिंकणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. तर, पहिल्यांदाच 40 वर्षांवरच्या एका गोलंदाजाचा पर्पल कॅप बहाल करण्यात आली आहे.
आयपीएल 2019मध्ये कोणता विक्रम सर्वात जास्त गाजला असेल तर तो आहे. सर्वाधित षटकार मारण्याचा. या यादीत आंद्रे रसेलटचं नाव आघाडीवर आहे. रसेलनं 13 सामन्यात 52 षटकार लगावले आहेत. तर, सगळ्यात जास्त चौकार डेव्हिड वॉर्नरनं लगावले आहेत. त्यानं 12 सामन्यात 57 चौकार लागवले आहेत.
आयपीएलच्या या हंगामात मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांनी एक वेगळा विक्रम केला आहे. हा विक्रम आहे, जोफ्रा आर्चर हा गोलंदाजांच्या नावावर. त्यानं 11 सामन्यात दोन मेडन ओव्हर टाकले आहेत. तर, त्यानंतर भारतीय फिरकीपटू हरभज सिंग याचा क्रमांक लागतो.
वॉर्नरनंतर आयपीएलच्या या हंगामात जर कोणी आपल्या फलंदाजांनी आतषबाजी केली असेल तर तो फलंदाज आहे जॉनी बेअरस्टो. बेअरस्टोच्या नावावर यंदाच्या हंगामातील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम आहे. बेअरस्टोनं बंगळुरू विरोधात 114 धावांची खेळी केवळ 52 धावांत केली होती.