चीनी मोबाईल कंपनी VIVO चं यावर्षी आयपीएल (IPL 2021) प्रायोजक म्हणून पुनरागमन होईल. VIVO आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातला करार 440 कोटी रुपये प्रतीवर्ष एवढा आहे.
चीनी मोबाईल कंपनी VIVO चं यावर्षी आयपीएल प्रायोजक म्हणून पुनरागमन होईल. अपेक्षेप्रमाणे ऑफर मिळाली नसल्यामुळे इतर कंपनीला प्रायोजक कंपनीचे अधिकार देण्यात आले नाहीत. (IPL/Twitter)
VIVO आणि बीसीसीआय यांच्यातला करार 440 कोटी रुपये प्रतीवर्ष एवढा आहे. पूर्व लडाखमध्ये हिंसात्मक झटापटीनंतर भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला होता, त्यामुळे मागच्यावर्षी VIVO चं प्रायोजकत्व निलंबित करण्यात आलं होतं.
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं, ड्रीम-11 आणि अनएकेडमी यांनी यावर्षी दिलेली ऑफर VIVO च्या अपेक्षेप्रमाणे नव्हती, त्यामुळे त्यांनी स्वत:च यावर्षी प्रायोजक बनण्याचा निर्णय घेतला. तसंच पुढच्यावर्षी शक्यता पडताळल्या जातील, असंही सांगण्यात आलं आहे.
ड्रीम -11 आयपीएल 2020 सालचं टायटल स्पॉन्सर होतं. ड्रीम-11 ने 222 कोटी रुपये देऊन हे अधिकार मिळवले होते. VIVO पाच वर्षांच्या करारात एका वर्षाला जेवढी रक्कम देते, त्याच्या ही अर्धी रक्कम होती. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार VIVO ने 2018-2022 या कालावधीमध्ये आयपीएल प्रायोजकत्वाचे अधिकार 2,190 कोटी रुपयांना मिळवले होते. (IPL/Twitter)