JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / EURO 2020 मध्ये भयंकर घटना, मॅच सुरू असताना मैदानातच कोसळला खेळाडू, LIVE VIDEO

EURO 2020 मध्ये भयंकर घटना, मॅच सुरू असताना मैदानातच कोसळला खेळाडू, LIVE VIDEO

युरो कपच्या (Euro Cup) डेन्मार्क आणि फिनलँडच्या (Denmark vs Finland) मॅचमध्ये भयंकर घटना घडली आहे. मॅच सुरू असताना डेन्मार्कचा ख्रिश्चन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : युरो 2020 (EURO 2020) डेन्मार्क आणि फिनलँडच्या (Denmark vs Finland) मॅचमध्ये भयंकर घटना घडली आहे. मॅच सुरू असताना डेन्मार्कचा ख्रिश्चन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला. एरिक्सन याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. ख्रिश्चन मैदानात कोसळल्यानंतर लगेचच डेन्मार्कची मेडिकल टीम मैदानात आली आणि त्याला प्रथमोपचार देण्यात आले.

एरिक्सन मैदानात कोसळल्यानंतर स्टेडियममध्येही भयाण शांतता पसरली. तसंच सगळे जण एरिक्सनसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान एरिक्सन मैदानातच कोसळल्यानंतर युरो कपचा हा सामना स्थगित करण्यात आला आहे. एरिक्सन याला हृदय विकाराचा धक्का आल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पण याबाबत अजून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. एरिक्सन मैदानात पडल्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांनाही रडू कोसळलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या