मुंबई, 14 जून : यंदाच्या युरो कप (Euro Cup 2020) मधला सगळ्यात भन्नाट गोल फूटबॉल चाहत्यांना चेक रिपब्लिक आणि स्कॉटलंड (Czech Republic vs Scotland) यांच्यातल्या सामन्यात बघालया मिळाला. चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक श्चिक याने हाफवे लाईन म्हणजेच मैदानाच्या बरोबर मधून मारलेला बॉल थेट गोल कीपरला चकवा देत नेटमध्ये गेला. या गोल नंतर चेक रिपब्लिकने एकच जल्लोष केला.
पॅट्रिक श्चिकने केलेला हा गोल अवघ्या काही मिनिटांमध्येच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या सामन्यात चेक रिपब्लिकने आधीच 1-0 ची आघाडी घेतली होती, यानंतर 51 व्या मिनिटाला पॅट्रिकने हा अफलातून गोल करत चेक रिपब्लिकची आघाडी वाढवली. ग्रुप डीमध्ये चेक रिपब्लिक आणि स्कॉटलंड यांच्यात हा सामना रंगला.
11 जून ते 11 जुलै दरम्यान युरो कपची स्पर्धा रंगणार आहे. याआधी 2016 साली पोर्तुगालने फायनलमध्ये फ्रान्सला धूळ चारली होती.