JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीमची घोषणा, जोफ्रा आर्चर बाहेर

IND vs ENG : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीमची घोषणा, जोफ्रा आर्चर बाहेर

टेस्ट आणि टी-20 सीरिजनंतर भारत आणि इंग्लंडमध्ये (India vs England) 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. यासाठीच्या 14 सदस्यीय टीमची इंग्लंडने निवड केली आहे. या टीमचं नेतृत्व इयन मॉर्गनकडे (Eoin Morgan) असेल, तर कोपराच्या दुखापतीमुळे फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) उपचारासाठी इंग्लंडला परतणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च : टेस्ट आणि टी-20 सीरिजनंतर भारत आणि इंग्लंडमध्ये (India vs England) 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. यासाठीच्या 14 सदस्यीय टीमची इंग्लंडने निवड केली आहे. या टीमचं नेतृत्व इयन मॉर्गनकडे (Eoin Morgan) असेल, तर कोपराच्या दुखापतीमुळे फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) उपचारासाठी इंग्लंडला परतणार आहे. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार जो रूट (Joe Root) याला वनडे टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. तर लियाम लिव्हिंगस्टोनला (Liam Livingstone) पहिल्यांदाच वनडे टीममध्ये संधी देण्यात आली आहे. लिव्हिंगस्टोन इंग्लंडच्या टी-20 टीममध्येही होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तर कव्हर म्हणून जॅक बॉल, क्रिस जॉर्डन आणि डेव्हिड मलानही टीमसोबत राहतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिन्ही वनडे पुण्यात होणार आहेत. पहिली मॅच 23 मार्च, दुसरी मॅच 26 तारखेला आणि तिसरी मॅच 28 मार्चला होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडचा टेस्ट सीरिजमध्ये 3-1 ने आणि टी-20 सीरिजमध्ये 3-2 ने पराभव केला. वनडे क्रमवारीमध्ये इंग्लंडची टीम सध्या पहिल्या क्रमांकावर आहे, पण त्यांना भारताला घरच्या मैदानात हरवणं कठीण जाईल. इंग्लंडची वनडे टीम इयन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉप्ले, मार्क वूड भारतीय वनडे टीम विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), लोकेश राहुल (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंगटन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर वनडे सीरिजचं वेळापत्रक पहिली वनडे-23 मार्च, पुणे दुसरी वनडे-26 मार्च, पुणे तिसरी वनडे-28 मार्च, पुणे किती वाजता सुरू होणार मॅच? भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता मॅचला सुरूवात होईल. तर एक वाजता टॉस होईल. कुठे पाहता येणार मॅच? भारत आणि इंग्लंड यांच्यातली मॅच स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवण्यात येईल. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे? या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीव्ही आणि हॉटस्टारवर पाहता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या