JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बाबो! कसला हा बाउन्सर? हेल्मेटचे दोन तुकडे झाल्याने गोंधळ, पाहा VIDEO

बाबो! कसला हा बाउन्सर? हेल्मेटचे दोन तुकडे झाल्याने गोंधळ, पाहा VIDEO

पाकिस्तान आणि झिम्बाब्वेमध्ये शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजाने टाकलेल्या बाउन्सरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरारे, 24 एप्रिल : भारतात आयपीएलचा थरार सुरू असताना तिकडे झिम्बाब्वेतील हरारे याठिकाणी झिम्बाब्वे आणि पाकिस्तान (Zimbabwe vs Pakistan) यांच्या दरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजाने टाकलेल्या बाउन्सरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानचा 20 वर्षीय गोलंदाज अर्षद इक्बालच्या (Arshad Iqbal) धडकी भरवणाऱ्या बाऊन्सरमुळे झिम्बाब्वेचा फलंदाज तिनाशे कमुनुकम्वेच्या (Tinashe Kamunhukamwe) हेल्मेटचे अक्षरश: दोन तुकडे झाले. सामन्यात इक्बालने त्याच्या दुसऱ्या षटकात टाकलेला हा बाउन्सर चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कमुनुकम्वेच्या थेट हेल्मेटवर जाऊन आदळला. त्यामुळे हेल्मेट तसेच राहिले आणि त्याच्या वरील भाग निघून मैदानात खाली पडला. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला, पाकिस्तानच्या फलंदाजांनी लगेच त्याच्याकडे धाव घेत, तो जखमी तर झाला नाही ना, याची पाहणी केली. मात्र, व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे त्याला दुखापत झाल्याचे दिसून येत नव्हते. मात्र, फलंदाजांना हेल्मेटविना खेळणे किती महागात पडू शकते याचे हे चांगलेच उदाहरण आहे.

संबंधित बातम्या

हेल्मेटचे दोन तुकडे झालेले पाहून झिम्बाब्वे संघाचे वैद्यकीय कर्मचारी ताबडतोब मैदानात धावत आले आणि त्यांनी चेंडू लागलेल्या ठिकाणी पाहणी केली, मात्र कमुनुकम्वेला सुदैवाने दुखापत झाली नसल्याने तो थोडक्यात बचावला. पण, या घटनेने अजिबात विचलित न होता कमुनुकम्वेने आपला खेळ सुरू ठेवत संघासाठी सर्वाधिक 34 धावा काढल्या, त्यामध्ये 4 चौकारांचा समावेश आहे. (हे वाचा -  IPL 2021: ‘जब शिकार करते हैं…’ पंजाबच्या विजयानंतर वासिम जाफरची पहिली प्रतिक्रिया ) दरम्यान, वेगवान गोलंदाज ल्यूक जोंगवे (18 धावांत 4 बळी) आणि लेगस्पिनर रियल बर्ल (२१/२) यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेने दुसर्‍या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानवर 19 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पाकिस्तान विरुद्धचा त्यांचा पहिलाच विजय आहे. याअगोदर दोन्ही संघांदरम्यान 15 सामने खेळले गेले असून पाकिस्तानने सर्व सामने जिंकले आहेत. (हे वाचा -  कोरोनातून बरं झालेल्यांना 6 महिन्यांपर्यंत मृत्यूचा अधिक धोका, अभ्यासकांच्या दाव्यानं वाढवली चिंता ) सामनामध्ये झिम्बाब्वेने हरारेच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 118 धावा केल्या होत्या. मात्र, या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ पुरता ढेपाळला. 99 धावांवर पाकिस्तानचे सर्व गडी बाद झाले. कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 41 धावा केल्या, मात्र दुसरीकडून चांगली साथ मिळाली नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद हसनैन आणि दानिश अझीझ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या