JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / वॉर्नर ते ब्राव्हो, या खेळाडूंना चढला 'पुष्पा फिवर', शेयर केले Dance Video

वॉर्नर ते ब्राव्हो, या खेळाडूंना चढला 'पुष्पा फिवर', शेयर केले Dance Video

अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पाचा (Pushpa) फिवर क्रिकेटपटूंनाही चढला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina), स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) यांच्यानंतर आता डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo) यांनीही व्हिडिओ शेयर केले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी : अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पाचा (Pushpa) फिवर क्रिकेटपटूंनाही चढला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina), स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) यांच्यानंतर आता डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo) यांनीही व्हिडिओ शेयर केले आहेत. क्रिकेटपटूंचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एवढच नाही तर ते चाहत्यांच्या पसंतीसही पडत आहेत. वॉर्नरने अल्लु अर्जुनच्या लूकमधला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला, यात त्याने फेस स्वॅपच्या मदतीने आपला चेहरा बदलला आहे. डेव्हिड वॉर्नरने या व्हिडिओमध्ये आपल्या चेहऱ्यावर अल्लु अर्जुनचा चेहरा लावला. यात त्याने ऍक्शन सीनसह डान्सही केला. 14 सेकंदाचा हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय होत आहे. मला अल्लू अर्जुनसारखं अभिनयाला सोपं करता आलं असतं तर, असं कॅप्शन वॉर्नरने या व्हिडिओला दिलं आहे.

वॉर्नरआधी त्याच्या मुलींनी या चित्रपटाचं गाणं सामी वर डान्स केला होता. त्या व्हिडिओला 15 लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं. सुरेश रैना आणि राहुल चहर यांनीही पुष्पा चित्रपटाच्या श्रीवल्ली गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ शेयर केला. वेस्ट इंडिजचा सुपरस्टार क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्होने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला, यात तोही श्रीवल्ली गाण्यावर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये डान्स करताना त्याची चप्पलही पायातून पडते. ट्रेण्डसोबत जाताना. वॉर्नर, रैना, मी कसा डान्स केला? असं कॅप्शन ब्राव्होने या व्हिडिओला दिलं.

जाहिरात

मागच्या वर्षी 17 डिसेंबरला रिलीज झालेला पुष्पा हा चित्रपट आणि त्याची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. सेलिब्रिटींसह अनेक चाहतेही या चित्रपटाशी निगडित असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेयर करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या