JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / The Ashes : डेव्हिड वॉर्नरचा टेस्ट क्रिकेटला अलविदा, पत्नीच्या पोस्टनंतर शिक्कामोर्तब!

The Ashes : डेव्हिड वॉर्नरचा टेस्ट क्रिकेटला अलविदा, पत्नीच्या पोस्टनंतर शिक्कामोर्तब!

ऑस्ट्रेलियन टीम सध्या ऍशेस सीरिजमध्ये इंग्लंडला टक्कर देत आहे. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची बॅट शांत आहे.

जाहिरात

डेव्हिड वॉर्नर लवकरच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेणार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै : ऑस्ट्रेलियन टीम सध्या ऍशेस सीरिजमध्ये इंग्लंडला टक्कर देत आहे. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची बॅट शांत आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये फ्लॉप झाल्यानंतर वॉर्नरला पुढच्या दोन टेस्टसाठी टीमबाहेर ठेवलं जाण्याची शक्यता आहे, त्यातच वॉर्नरची पत्नी कॅन्डीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे डेव्हिड वॉर्नर टेस्ट क्रिकेटला अलविदा करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कॅन्डी वॉर्नरच्या या पोस्टमुळे डेव्हिड वॉर्नर लवकरच निवृत्ती घेईल, हे स्पष्ट झालं आहे. मागच्या वर्षात डेव्हिड वॉर्नरला रन करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता, पण नंतर त्याने एक डबल सेंच्युरीही केली, यामुळे चाहत्यांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. पण आता पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नर फॉर्मसाठी झगडताना दिसत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यानेही आपण चांगल्या ओपनरच्या शोधात असल्याचं वक्तव्य केलं आहे. ऍशेस सुरू असतानाच वॉर्नरच्या पत्नीने तीन मुली, स्वत: आणि डेव्हिड वॉर्नरचा फोटो शेअर केला आहे. टेस्ट क्रिकेट टीमसोबत प्रवास करताना आमच्या एका युगाचा अंत झाला आहे. खूपच मजा आली, मी आणी आमची गर्ल गँग कायमच तुझ्या पाठीशी राहू. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, डेव्हिड वॉर्नर, असं कॅप्शन कॅन्डी वॉर्नरने या फोटोला दिलं आहे.

डेव्हिड वॉर्नरने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. जानेवारी 2024 साली पाकिस्तानविरुद्धची सिडनी टेस्ट आपली शेवटची असेल, असं डेव्हिड वॉर्नरने आधीच सांगितलं आहे. सिडनी हे डेव्हिड वॉर्नरचं होम ग्राऊंड आहे, त्यामुळे त्याला शेवटची टेस्ट सिडनीमध्ये खेळायची आहे. वॉर्नरचा हा फॉर्म बघता त्याला शेवटच्या दोन ऍशेस टेस्टमध्ये संधी मिळते का? हा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या