JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final: संथ खेळणाऱ्या विल्यमसनला सेहवागनं केलं ट्रोल, शेअर केलं मजेदार Meme

WTC Final: संथ खेळणाऱ्या विल्यमसनला सेहवागनं केलं ट्रोल, शेअर केलं मजेदार Meme

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनची (Kane Williamson) संयमी खेळी हे पाचव्या दिवसाचे वैशिष्ट्य होते. त्याच्या या संथ खेळीबद्दल टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने त्याला ट्रोल केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साऊथम्पटन, 23 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या फायनल मॅचमध्ये (WTC Final) न्यूझीलंडनं पहिल्या इनिंगमध्ये 32 रनची आघाडी घेतली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनची (Kane Williamson) संयमी खेळी हे पाचव्या दिवसाचे वैशिष्ट्य होते. त्याचे अर्धशतक फक्त 1 रननं हुकले. मात्र, त्याच्या खेळीमुळेच न्यूझीलंडला महत्त्वाची आघाडी मिळवता आली. विल्यमसननं न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. त्याचवेळी त्याच्या संथ खेळीमुळे तो ट्रोल होत आहे. सेहवागनं केलं ट्रोल विल्यमसननं फायनल टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 49 रन काढण्यासाठी 177 बॉल घेतले. त्याने तब्बल 294 मिनिटे बॅटींग केली. त्याच्या या संथ खेळीबद्दल टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने त्याला ट्रोल केलं आहे. सेहवागनं विल्यमसनच्या खेळीचं वर्णन करण्यासाठी झोपणाऱ्या कुत्र्याचं मीम (Meme) शेअर केलं आहे. त्याचं हे ट्विट चांगलंच व्हायरल (Viral) झालंय.

विल्यमसनचा रेकॉर्ड विल्यमसननं पहिल्या 100 बॉलवर फक्त 15 रन केले. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केन विलियमसनने 100 बॉल खेळून इतके कमी रन केले. केन विलियमसनने या इनिंगमध्ये एनरिक नॉर्किया (Anrich Nortje) आणि चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) विक्रम मोडला. पुजाराने यावर्षी ऑस्ट्रेलियात 100 बॉलमध्ये 16 रन केले, तर नॉर्कियाने मागच्यावर्षी इंग्लंडविरुद्ध 100 बॉलमध्ये 16 रन केले होते. त्याला अखेर इशांत शर्माने (Ishant Sharma) आऊट केले. कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) त्याचा कॅच घेतला.

न्यूझीलंडच्या खेळाडूच्या भावी पत्नीचा मॅचपूर्वी मृत्यू, तरीही तो बॅटींगला उतरला आणि… न्यूझीलंडनं पहिल्या इनिंगमध्ये  249 रन काढत 32 रनची आघाडी घेतली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 आऊट 64 रन केले होते.  टीम इंडियाकडे सध्या 32 रनची आघाडी आहे.  दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा 12 रनवर तर विराट कोहली 8 रनवर खेळत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या