JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आरोप-प्रत्यारोपांनंतर रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यामध्ये सारं काही आलबेल? कोचनी दिली पहिली प्रतिक्रिया

आरोप-प्रत्यारोपांनंतर रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यामध्ये सारं काही आलबेल? कोचनी दिली पहिली प्रतिक्रिया

भारतीय महिला टीमचे मुख्य कोच रमेश पोवार (Ramesh Powar) यांनी नव्या जबाबदारीनंतर कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) बरोबर झालेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जून : भारतीय महिला टीमचे मुख्य कोच रमेश पोवार (Ramesh Powar) यांनी नव्या जबाबदारीनंतर कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) बरोबर झालेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रमेश पोवार यापूर्वी टीमचे कोच होते तेव्हा इंग्लंडमध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचे महिला टीमशी मतभेद झाले होते. या मतभेदानंतर त्यांची पदावरुनन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोवार यांची मुख्य कोच म्हणून निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पोवार यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही एकमेकांशी चर्चा केली होती. अन्यथा मी महिला क्रिकेटमध्ये परत आलोच नसतो. आमच्या समोर एक मोठं लक्ष्य असून एक जबाबदारी आणि आणखी एक संधी आहे. पुढच्या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी 10 महिन्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे.’’ महिला टीमनं आजवर एकदाही वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेली नाही. 2017 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये टीमनं फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता पुढे जायला हवं " ही मी, मिताली आणि पूर्ण टीमसाठी चांगली संधी आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर पुन्हा विचार करावा असं मला वाट नाही. मी एनसीएमध्ये राहुल द्रविडसमोबत राहिलो आहे. तो किती शिस्तबद्ध आहे हे सर्वांना माहिती आहे.” असे रमेश पोवार यांनी स्पष्ट केले. ICC चं क्रिकेट फॅन्सना गिफ्ट, दुबईतील बैठकीत वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय यापूर्वी मिताली राजने  सर्व वाद विसरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “यापूर्वी घडलेल्या घटना हा भूतकाळ आहे. आता आपण मागे जाऊ शकत नाही. रमेश पोवार यांच्याकडे नक्कीच काही योजना असतील. आम्ही दोघे मिळून टीमचं जहाज पुढे नेणार आहोत. आम्ही एकत्र काम करु आणि भविष्यातील मजबूत टीम तयार करु, कारण पुढच्या वर्षी वर्ल्ड कप देखील आहे.’ असे मितालीने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या