मुंबई, 17 सप्टेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पण, याची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती. विराटनं कॅप्टनसी सोडण्याचं कारण हे वर्कलोड मॅनेजमेंट हे दिलं आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC) नंतर त्याच्या बॅटींगमधील खराब कामगिरीमुळे ही चर्चा सुरू झाली होती. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसीर नवी निवड समिती आणि कोचिंमध्ये होणाऱ्या बदलामुळे विराट समोरचं आव्हान वाढलं होतं. यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये शिखर धवनचा टीममध्ये समावेश करण्यासाठी विराटला संघर्ष करावा लागला. त्या जागेवर विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ओपनिंग बॅट्समनचा टीममध्ये समावेश करावा असं निवड समितीचं मत होतं. पण, विराट धवनसाठी आग्रही होता. 5 दिवस पाहावी लागली वाट निवड समितीनं त्यानंतर श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनला कॅप्टन केलं होतं. पण मार्च महिन्यात झालेल्या बैठकीनंतर सहमती होण्यासाठी 5 दिवस लागले होते. या विषयावर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन आणि निवड समिती यांच्यातील वाद काही नवा नाही. पण मार्च महिन्यातील प्रकरण याला अपवाद आहे. दुसरिकडं विराटला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. बीसीसीआयची त्याच्यावरील दबाव कमी करण्याची इच्छा होती. असं विराटच्या जवळच्या मंडळीनी सांगितलं आहे. विराट आणि रोहितपेक्षाही खडतर असेल नव्या कोचसमोर आव्हान, शास्त्रींच्या जाण्यानंतर वाढणार अडचणी याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीनं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि निवड समितीच्या प्रमुखांना या निर्णयाबाबत कल्पना दिली होती. निवड समिती आणि बीसीसीआयला वेळ मिळावा म्हणून त्यानं टी20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यानं गुरुवारी ही घोषणा केली. विराट वन-डे टीमची कॅप्टनसी यापूढेही करेल असं जय शहा यांनी यानंतर स्पष्ट केले.