JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'तू सोबत असतेस तेव्हा..' विराटनं अनुष्काबरोबरचा शेअर केला खास Photo, पत्नीनं दिलं मजेशीर उत्तर

'तू सोबत असतेस तेव्हा..' विराटनं अनुष्काबरोबरचा शेअर केला खास Photo, पत्नीनं दिलं मजेशीर उत्तर

टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) सोशल मीडियावर पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर अनुष्कानं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 नोव्हेंबर: टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याला टी20 वर्ल्ड कपनंतर विश्रांती देण्यात आली आहे. तो न्यूझीलंड विरुद्धची टी20 सीरिज तसेच कानपूर टेस्टमध्ये खेळलेला नाही. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी (India vs New Zealand Mumbai Test) टीम इंडियात दाखल होतील. सध्या सुट्टीचा आनंद घेत असलेल्या विराटनं सोशल मीडियावर पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोबतचा फोटो शेअर केला आहे. विराटनं या फोटोला दिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘तू माझ्यासोबत असलीस तर मला कुठेही घरासारखे वाटते’ असं कॅप्शन विराटनं दिलं आहे. विराटचे हे कॅप्शन फॅन्सना भलतेच आवडले असून त्यांनी या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. या फोटोत विराट आणि अनुष्का नदीच्या काठावर बसलेले आहेत.  या दोघांचेही तोंड नदीकडे असून त्यांचा  पाठमोरा फोटो विराटनं शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

विराटच्या फोटोला अनुष्का शर्मानं मजेदार उत्तर दिलं आहे. ‘ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण, तू घरी कमीच असतोस’ असं अनुष्काचं मजेशीर उत्तर सोशल मीडियावर सुपर हिट झाले आहे.

विराट सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्याने यापूर्वी जिममध्ये व्यायाम करत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक ठरली. भारतीय टीमला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. विराटनं या वर्ल्ड कपपूर्वीच टी20 प्रकारातील कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजपूर्वी रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन बनला आहे. आता विराट मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या