JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / PSL Final : पाकिस्तानी बॉलरनं हात जोडून अंपायरला केली Out देण्याची विनंती, Video Viral

PSL Final : पाकिस्तानी बॉलरनं हात जोडून अंपायरला केली Out देण्याची विनंती, Video Viral

लाहोर कलंदर्स टीमनं पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेच्या फायनलमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी :  लाहोर कलंदर्स टीमनं पाकिस्तान सुपर लीग  (Pakistan Super League) स्पर्धा जिंकली आहे. शाहीन आफ्रिदीच्या टीमनं मुलतान सुलतानचा फायनलमध्ये 42 रननं पराभव केला. याबरोबरच शाहीन आफ्रिदी सर्वात कमी वयामध्ये टी20 लीग जिंकणारा कॅप्टन बनला आहे.यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) नावावर हा रेकॉर्ड होता. त्याने 2012 साली 22 वर्ष 240 दिवस वय होते त्यावेळी सिडनी सिक्सर्ससाठी बिग बॅश स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आफ्रिदीनं  21 वर्ष 327 दिवस इतके वय असताना टी20 लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. लाहोरच्या या विजयाचा हिरो मोहम्मद हाफिज ठरला. त्याने 46 बॉलमध्ये 69 रनची खेळी केली. त्याचबरोबर 2 विकेट्सही घेतल्या. याबरोबरच सुलतानचा शाहनवाज दहानी देखील फायनलनंतर चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

लाहोरच्या इनिंगमधील 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर दहानीनं हाफीजला कॅच आऊट केले. हाफिज आऊट होताच दहानी अंपायर सलीम डार यांच्याजवळ गेला. त्याने हात जोडून हाफीजला आऊट देण्याची विनंती केली. त्यावर अंपायर डार यांनीही हात जोडून हाफिजला पॅव्हिलियनमध्ये जाण्याचा इशारा केला. बॉलर आणि अंपायरची ही कृती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. एका मॅचमध्ये 774 बॉल टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या दिग्गज बॉलरचे निधन लाहोरकडून हाफिजसह हॅरी ब्रुकनं 22 बॉलमध्ये नाबाद 41 तर डेव्हिड विसनं 8 बॉलमध्ये नाबाद 28 रन करत लाहोरचा स्कोअर 180 पर्यंत पोहचवला.मुलतानची सुरूवात खराब झाली. टॉप ऑर्डरनं त्यांची अवस्था 4 आऊट 50 अशी झाली होती. कॅप्टन मोहम्मद रिझवाननं फक्त 14 रन केले. टीम डेव्हिडनं 27 तर खुशदिल शाहनं 32 रन करत टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची सपूर्ण टीम 19.3 ओव्हर्समध्ये 138 रन करत ऑल आऊट झाली. कॅप्टन शाहीन आफ्रिदीला 3 विकेट्स मिळाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या