मुंबई, 2 जानेवारी : नवे वर्ष सुरू होताच पाकिस्तान क्रिकेटमधील मतभेदाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी (Pakistan Cricket Team) 2021 हे चांगले ठरले. या वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 होण्याचे त्यांचे ध्येय आहे. यासाठी पाकिस्तान टीमला विदेशी कोच असावा अशी मागणी टीमचा कॅप्टन बाबर आझमने (Babar Azam) केली आहे. बाबरच्या या मागणीला मोहम्मद रिझवान आणि टीमचे सध्याचे कोच सकलेन मुश्ताक यांनी पाठिंबा दिलाय. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (PCB) रमीझ राजा (Ramiz Raja) यांचे वेगळे मत आहे. राजा यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, ‘मी बाबर, सकलेन आणि रिझवानशी नवा कोच कोण असावा याबाबत चर्चा केली. त्या सर्वांना विदेशी कोच हवा आहे. पण, माझे मत वेगळे आहे. विदेशी दौऱ्यामध्ये टीमसोबत लोकल कोच असणे आवश्यक आहे. विदेशी कोचची फक्त ड्रेसिंग रूममधील वातावरण नीट ठेवण्यासाठी मदत होते.’ विदेशातील दौरा महत्त्वाचा पीसीबी अध्यक्षांनी यावेळी पाकिस्तान टीमनं केलेल्या कामगिरीबद्दलही मत व्यक्त केले. ‘बांगलादेश आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात गरजेपेक्षा जास्त तांत्रिक कोच नसावेत अशी आमची भूमिका होती. खेळाडू स्वत:च्या जीवावर अवघड परिस्थितीचा कसा सामना करता हे आम्हाला पाहायचे होते. कुणाचीही मदत न घेता कठीण परिस्थितीवर मात करत नाही, तोपर्यंत तुम्ही किती महान आहात, याचा अंदाज लावता येत नाही.’ असे राजा यांनी स्पष्ट केले.
नव्या कोचचा शोध पीसीसीबीने यापूर्वीच पाच वेगवेगळ्या कोचच्या पदासाठी जाहिरात दिली आहे. यामध्ये हाय परफॉर्मंन्स कोचचाही समावेश आहे. गेल्या दशकात 5 वर्ष कोचिंगचा अनुभव असणारा व्यक्तीच या पदासाठी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर त्याने मोठे खेळाडू, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय टीमसोबत काम करणे आवश्यक आहे. सौरव गांगुलीला ओमायक्रॉन नाही तर ‘या’ Variant ची लागण, हॉस्पिटल रिपोर्टमधून खुलासा ऑस्ट्रेलिया टीम यावर्षी मार्च महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही टीममध्ये 3 टेस्ट आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे.