JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / व्यंकटेश प्रसादशी 1996 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या वादावर सोहेलचं स्पष्टीकरण, म्हणाला...

व्यंकटेश प्रसादशी 1996 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या वादावर सोहेलचं स्पष्टीकरण, म्हणाला...

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 1996 साली झालेल्या वर्ल्ड कप (ICC World Cup) स्पर्धेतील मॅचच्या आठवणी आजही क्रिकेट फॅन्सच्या मनात ताज्या आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 1996 साली झालेल्या वर्ल्ड कप (ICC World Cup)  स्पर्धेतील मॅचच्या आठवणी आजही क्रिकेट फॅन्सच्या मनात ताज्या आहेत. त्या मॅचमध्ये व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि आमिर सोहेल  (Aamir Sohail) यांच्यात झालेला वाद गाजला होता. मॅच दरम्यान सोहेल वारंवार प्रसादला चिथावत होता. त्यामुळे नंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मागच्या वर्षी आर. अश्विनच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रसादने संपूर्ण वादावर त्याचे मत मांडले होते. ‘क्रिकेट लाईफ’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोहेलने या वादावर त्याची बाजू मांडली आहे.“माझ्यात आणि व्यंकटेश प्रसादमध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात येते तसा वाद झाला नाही. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली नव्हती. बॉलर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कसं उत्तर द्यायचे हे आम्हाला जावेद मियादाँदने शिकवले होते.’’ असे सोहेलने या मुलाखतीमध्ये सांगितले. सोहेल पुढे म्हणाला की, “मी आणि सईद अन्वर रन काढत होतो. अन्वर आऊट झाला. त्यामुळे आमच्यावर दबाव येत होता. भारत मॅचवर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, असं मला वाटले. मी व्यंकटेश प्रसादला थोडे डिवचत होतो. तिथं खूप साऱ्या गोष्टी घडत होत्या. भारत त्या मॅचमध्ये तीन बॉलर्स घेऊन उतरला होता. पिच हळहळू आणखी खराब होईल, हे आम्हाला माहिती होते.  आमची एक ओव्हर कमी करण्यात आली होती.

व्यंकटेश प्रसादला बॉलिंगमध्ये लय सापडली आहे, असे मला वाटले होते. मी त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला डिवचण्यास सुरुवात केली. त्याच्या बॉलिंगची  दिशा बिघडवण्याचा माझा प्रयत्न होता. मी त्याला काही तरी बोललो. लोकांनी त्या घटनेला वेगवेगळ्या पद्धतीने सादर केले. मी संयम गमावला होता, असे लोकांचे मत झाले.” असे स्पष्टीकरण सोहेलने दिले. मोहम्मद आमिर आणखी एक T20 लीग खेळणार, IPL बद्दल केलं मोठं वक्तव्य काय घडला होता प्रसंग? आमिर सोहेलने व्यंकटेश प्रसादला कव्हर्सच्या दिशेने फोर मारला होता. त्यानंतर सोहेलने त्या दिशेने बोट दाखवून प्रसादला डिवचले. प्रसादने पुढच्याच बॉलवर सोहेलला आऊट करत चोख उत्तर दिले. या घटनेला यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या