लाहोर, 24 मे : पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) समितीचा सदस्य वासिम अक्रम (Wasim Akram) टीम मॅनेजमेंटवर नाराज झाला आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरकडे (Mohammad Amir) टीम मॅनेजमेंटनं केलेल्या दुर्लक्षाबद्दल अक्रमने टीम मॅनेजमेंटला सुनावले आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठीच्या पाकिस्तान टीममध्ये आमिर हवा आहे, असे अक्रमने स्पष्ट केले. टीम मॅनेजमेंटने नीट वागणूक दिली नाही, म्हणून आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मोहम्मद आमिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धा खेळतो. आमिर कराची किंग्ज (Karachi Kings) या टीमचा सदस्य आहे. अक्रम या टीमचा मुख्य कोच आणि संचालक आहे. “आमिरने टेस्ट क्रिकेट सोडले असेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याचा कुणाला राग येण्याची गरज नाही. दुसऱ्या खेळाडूंनी असं केल्यानंतर त्यांना कुणी काही म्हंटले नाही. तर, आमिरसाठीच हा भेदभाव का? तो दुसऱ्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी तयार असेल तर त्याची निवड करायला हवी.’’ असे अक्रमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आमिर मागच्या वर्षी पाकिस्तानकडून शेवटचा खेळला होता. पाकिस्तानचे मुख्य कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकाय युनूस यांच्याशी त्याचा वाद झाला. त्यानंतर या दोघांसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय आमिरने घेतला आहे. श्रीलंकेनंतर आणखी एका टीममध्ये कोरोनाचा शिरकाव, प्रॅक्टिस स्थगित “वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत पाकिस्तानला अनुभवी बॉलरची गरज आहे. जो नव्या बॉलर्सना सल्ला देईल आणि त्यांना मार्गदर्शन करेल. इंग्लंडचा दौरा हा पाकिस्तानसाठी टी 20 वर्ल्ड कपची तयारीसाठी शेवटची संधी आहे. आगामी वर्ल्ड कप भारताच्या ऐवजी युएईमध्ये झाला, तर त्याचा पाकिस्तानला फायदा होईल. कारण, पाकिस्तानची टीम युएईमध्ये नियमित क्रिकेट खेळते.” असा दावा अक्रमने केला आहे.