JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध?

या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध?

गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात कटुता आली आहे. आता तर मीडियात क्लार्कचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले आहे

0105

ऑस्ट्रेलियाला २०१५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार मायकल क्लार्क एका मोठ्या संकटात अडकताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियातील मीडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मायकल क्लार्कचे विवाहबाह्य संबंध आहेत. असं म्हटलं जातं की, क्लार्कचे अफेअर त्याची असिस्टंट साशा आर्मस्ट्राँगशी आहे. साशा क्लार्कच्या क्रिकेट अकादमीचे काम सांभाळते. (छाया सौजन्य- matrixpictures.com.au)

जाहिरात
0205

मायकल क्लार्क विवाहीत असून त्याला एक मुलगीही आहे. क्लार्कने २०१२ मध्ये व्यावसायिक आणि मॉडेल कायली बॉल्डीशी विवाह केला. पण, गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात कटुता आली आहे. आता तर मीडियात क्लार्कचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणामुळे क्लार्कची पत्नी कायली फार नाराज आहे. (छाया सौजन्य- matrixpictures.com.au)

जाहिरात
0305

ऑस्ट्रेलियातील मीडियामध्ये क्लार्क आणि साशाचे काही फोटो लीक झाले आहेत. या फोटोत दोघंही एका लग्झरी यॉर्टवर एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. या फोटोमध्ये साशा बिकीनीमध्ये आहे. फोटोंमधून दोघांमध्ये फार जवळीक असल्याचे दिसून येत आहे. (छाया सौजन्य- matrixpictures.com.au)

जाहिरात
0405

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्लार्क आणि साशा दोघंही एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखत आहेत. दोघं एकमेकांसोबत अनेकदा वेळ घालवताना आणि स्विमिंग करताना दिसतात. (छाया सौजन्य- matrixpictures.com.au)

जाहिरात
0505

फोटोंमध्ये क्लार्क आणि साशा फार निवांत दिसत आहेत. मात्र, हे फोटो लीक झाल्यामुळे त्याचा मूड कसा असेल हे काही सांगता येत नाही. (छाया सौजन्य- matrixpictures.com.au)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या