मुंबई, 9 डिसेंबर : क्रिकेटला अधिक फास्ट बनवण्यात T20 चे योगदान मोठे आहे. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये मोठा स्कोअर करण्यासाठी या प्रकारात वेगवान खेळणे आवश्यकच असते. श्रीलंकेत सध्या लंक प्रीमियर लीग (Lanka Premier League 2021-22) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जाफना किंग्सकडून खेळणाऱ्या 23 वर्षांच्या श्रीलंकन बॅटरने सलग 5 सिक्स लगावले. पावसामुळे ही मॅच 14 ओव्हर्सची निर्धारित करण्यात आली होती. कँडी वॉरियर्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. जाफनाची सुरूवात खराब झाली. त्यांनी 2 विकेट्स झटपट गमावल्या. त्यानंतर अविष्का फर्नाोंडोने (Avishka Fernando) कॅप्टन परेरासोबत 105 रनची पार्टनरशिप केली. सहाव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर परेरानं एक रन काढला. त्यानंतर 23 वर्षांच्या अविष्कानं त्याच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठ्या असलेला ऑफ स्पिनर तिलकरत्ने संपतच्या ओव्हरमधील पुढील पाचही बॉलवर सिक्स लगावले. परेरानं पहिल्या बॉलवर एक रन काढला होता. त्यामुळे अविष्काला एका ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावता आले नाहीत. पण, त्याला आणखी एक संधी होती.
पुढच्या ओव्हरध्ये रोवमॅन पॉवेल बॉलिंगसाठी आला. पॉवेलनं अविष्कासला फुटॉस दिलाा होता. पण, अविष्काला त्या बॉलवर सिक्स मारता आला नाही. त्याने त्या बॉलवर 2 रन काढले. अविष्कानं या मॅचमध्ये फक्त 23 बॉलमध्ये 7 सिक्ससह 53 रन काढले. टीम इंडियाला मिळाला जडेजा-अक्षरचा वारसदार, धोनीशी आहे खास कनेक्शन जाफना किंग्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 14 व्हर्समध्ये 6 आऊट 181 रन केले. कँडीसा हे आव्हान पेलवले नाही. त्यांची टीम निर्धारित ओव्हर्समध्ये 5 आऊट 166 रन करू शकली.