मुंबई, 1 जुलै: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडच्या विजयात ऑल राऊंडर काईल जेमिसनचं (Kyle Jamieson) योगदान मोलाचं होतं. त्याने फायनलमध्ये एकूण 7 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) त्याने दोन्ही इनिंगमध्ये आऊट केले. जेमिसन विराट कोहलीच्याच आरसीबी टीमचा (RCB) सदस्य आहे. फायनलमध्ये आरसीबी कॅप्टन विरुद्ध त्याचं पारडं जड ठरलं. फायनलमधील बॉलिंग बरोबरच जेमिसन आणखी एका गोष्टीमुळे सध्या चर्चेत आहे. आयपीएलमध्येही विराटने काईल जेमिसनला नेटमध्ये ड्युक बॉलने बॉलिंग करायला सांगितलं होतं, पण जेमिसनने विराटला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. काईल जेमिसन हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये आपल्याला त्रास देऊ शकतो, हे विराटला माहिती होतं, त्यामुळे त्याने जेमिसनला ड्युक बॉलने बॉलिंग करायला सांगितलं होतं. पण जेमिसननं ती विनंती फेटाळली असं वृत्त होतं. जेमिसननं सांगितलं रहस्य जेमिसनननं नकार दिल्याच्या वृत्तावर विराट कोहलीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र जेमिसननं या घटनेचं सत्य सांगितलं आहे. सध्या मीडियामध्ये सांगितली जात असलेली बातमी ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर डॅनियल ख्रिस्टीन याने तयार केलेली आहे. ही बातमी निराधार आहे. ख्रिस्टीननं घटनेमध्ये मसाला टाकण्यासाठी ही गोष्ट तयार केली आहे, असे त्याने स्पष्ट केले. जेमिसननं स्पोर्टिंग न्यूजला बोलताना नेमकी घटना सांगितली आहे. “ही डॅनियल ख्रिस्टीननं रचलेली गोष्ट आहे. विराटने मला नेटमध्ये बॉलिंग करायला सांगितले नव्हते. आम्ही दोघं आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीला भारत आणि न्यूझीलंडच्या इंग्लंड दौऱ्याबद्दल बोलत होतो. त्यावेळी माझ्याकडं काही ड्युक बॉल असल्याचं मी त्याला सांगितले. त्यावर विराटही माझ्याकडे काही ड्युक बॉल असल्याचं म्हणाला. आपण या बॉलवर प्रॅक्टीस करु शकतो इतकंच विराट मला म्हणाला होता. त्याने बॉलिंग करण्याबद्दल आग्रह केला नाही. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. या प्रकरणात समोर आलेली गोष्ट फार मजेदार आहे.” असे जेमिसनने सांगितले. IPL 2021: भारतीय फॅन्ससाठी Good News, ‘या’ देशाचे क्रिकेटपटू खेळण्यास तयार आयपीएलच्या लिलावामध्ये विराटच्या आरसीबीने काईल जेमिसनवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. जेमिसनला बँगलोरने तब्बल 15 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. काईल जेमिसनने याआधी 2019-2020 सालीही भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात विराट कोहली आणि टीम इंडियाला त्रास दिला होता.