JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Russia-Ukraine War: गॅरी कस्टर्नच्या मित्रानं सांगितला युद्धाचा Live अनुभव, म्हणाले...

Russia-Ukraine War: गॅरी कस्टर्नच्या मित्रानं सांगितला युद्धाचा Live अनुभव, म्हणाले...

रशिया आणि युक्रेन यांच्या सैन्यात सध्या युद्ध (Russia-Ukraine War) सुरू आहे. रशियन सैन्य युक्रेनमध्ये दाखल झालं आहे. भारतासह जगभरातील वेगवेगळ्या देशांचे नागरिक सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी : रशिया आणि युक्रेन यांच्या सैन्यात सध्या युद्ध (Russia-Ukraine War) सुरू आहे. रशियन सैन्य युक्रेनमध्ये दाखल झालं आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये भारतीय नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भारतासह जगभरातील वेगवेगळ्या देशांचे नागरिक सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कस्टर्न (Gary Kristen) यांचे मित्र कोबस ओलिविएर (Kobus Olivier) यांचा समावेश आहे. कोबस सध्या क्रिकेटच्या प्रसारासाठी युक्रेनमध्ये आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना युक्रेन क्रिकेट फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोबस यांनी युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव सांगितला. ‘मी काल सकाळी 9 स्फोट ऐकले. स्फोटांचा आवाज ऐकून मला धक्का बसला. मी खिडकीच्या बाहेर पाहिलं तर एखादा सिनेमा सुरू आहे, असं वाटलं. लहान मुलं रस्त्यावर पळत होती. कुणाच्या हातामध्ये सामान होतं. तर कुणासोबत पाळीव जनावरं होती. सर्वजण घाबरलेली दिसत होती. गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या, लोकं शहरं सोडून जात होते. युद्ध सुरू झालंय हे माझ्या लक्षात आले.’ 62 वर्षांच्या कोबस यांनी गॅरी कस्टर्नसोबत दक्षिण आफ्रिकेत क्लब क्रिकेट खेळले आहे. ते सध्या युक्रेनमधील निव्की या शहरामध्ये राहतात. हे शहर युक्रेनची राजधानी कीवपासून जवळपास 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. यावेळी कोबस यांनी स्वत:ला फ्लॅटमध्ये कोंडूंन घेतलं आहे. ते सध्या युद्ध थांबण्याची वाट पाहात आहेत.’ Russia -Ukraine War: जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी पुन्हा खरी! 2014 मधील Tweet Viral कोबस यांनी पुढे सांगितलं की, ‘मी यापूर्वी पैसे काढले होते. तसंच किरणा साहित्यही जमा केले आहे. या प्रकारच्या धोक्याची मला कल्पना होती. अनेकांचा यावर कोणताही विश्वास नव्हता. आता ती लोकं आमच्या अपार्टमेंटच्या जवळ आहेत. रशियन सैनिक कधीही येऊ शकतात. मला सतत क्षेपणास्त्रं आणि बॉम्ब स्फोटाचा आवाज ऐकू येत आहे. आमच्यासाठी युद्ध लवकर संपावं, अशी प्रार्थना करा,’ असं आवाहन त्यांनी केलं. युक्रेनमधील परिस्थिती गंभीर असूनही देश सोडण्यास मात्र कोबस यांनी नकार दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या