मुंबई, 11 फेब्रुवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी होणारे खेळाडूंचे ऑक्शन आता काही तासांवर आले आहे. यंदा 8 ऐवजी 10 टीम ऑक्शनमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर हे मेगा ऑक्शन असल्यानं सर्वच टीम मोठ्या तयारीसह या ऑक्शनमध्ये उतरणार आहेत. या ऑक्शनपूर्वी प्रीती झिंटाच्या (Priety Zinta) पंजाब किंग्जला (Punjab Kings) मोठा धक्का बसला आहे. पंजाबचा बॅटींग कोच वासिम जाफरनं (Wasim Jaffer) राजीनामा दिला आहे. जाफरनं ट्विट करत राजीनाम्याची माहिती दिली. टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे (Anil Kumble) या टीमचा हेड कोच आहे. जाफर 2019 पासून पंजाब टीमचा बॅटींग कोच होता. लिलावाच्या तोंडावर जाफरनं राजीनामा दिल्यानं पंजाबला मोठा धक्का बसला आहे. आता आगामी काळात पंजाबला खेळाडूंसह बॅटींग कोच देखील शोधावा लागेल. जाफरनं मजेदार ट्विट करत राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याने रणबीर कपूरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमातील ‘अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना’ या गाण्याच्या फोटोसह ट्विट केले आहे. त्याचबरोबर अनिल कुंबळे आणि संपूर्ण पंजाब टीमला IPL 2022 साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंजाब किंग्जनं मयांक अग्रवाल आणि अर्शदीप सिंह या दोन खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी रिटेन केले आहे. त्यांच्याकडे सर्वात जास्त 72 कोटी रूपये शिल्लक आहेत. पंजाबच्या टीमची आगामी आयपीएलसाठी केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन करण्याची इच्छा होती. पण, राहुलने त्यांना नकार दिला. ‘मी काम केलं आणि त्याचं श्रेय इतरांनी घेतलं’, अजिंक्य रहाणेचा खळबळजनक आरोप पंजाबचे असिस्टंट कोच अँडी फ्लॉवर यांनी यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. आता ते लखनऊ सुपर जायंट्स या नव्या आयपीएल टीमचे हेड कोच आहेत. पंजाब किंग्जला आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. मागील 4 सिझनमध्ये त्यांना ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यातही अपयश आले आहे.