लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (LSG vs RCB) यांच्यात बुधवारी आयपीएल एलिमेनेटरचा सामना होणार आहे. या मॅचपूर्वी आरसीबीसाठी गुड न्यूज आहे.
मुंबई, 25 मे : लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (LSG vs RCB) यांच्यात बुधवारी आयपीएल एलिमेनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यातील पराभूत टीम स्पर्धेतून आऊट होईल. (PC: harshal patel instagram )
दोन्ही टीमसाठी 'करो वा मरो' असलेल्या या लढतीमध्ये आरसीबीचा धोकादायक बॉलर फिट झाला आहे. (Harshal Patel Instagram)
गुजरात टायटन्स विरूद्धच्या मॅचमध्ये जखमी झालेला हर्षल पटेल या लखनऊ विरूद्धच्या मॅचसाठी पूर्ण फिट झाला आहे. त्यानं स्वत: ही माहिती दिली आहे. (PIC-PTI)
हर्षलनं या सिझनमधील 13 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. गुजरात टायटन्स विरूद्ध फिल्डिंग करताना त्याच्या हाताला जखम झाली होती. (Harshal Patel Instagram)
हर्षलनं गुजरात विरूद्ध फक्त 1 ओव्हरच बॉलिंग केली. त्यानं या सिझनमध्ये आरसीबीकडून हसरंगा (24 विकेट्स) नंतर सर्वाधिक विकेट्स घेतल्या असून तो मॅच विनर खेळाडू आहे. (PTI)