बंगळुरू, 13 फेब्रुवारी : पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ( Royal Challengers Bangalore) आगामी सिझनसाठी टीम निश्चित झाली आहे. आरसीबीनं मेगा ऑक्शनपूर्वी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) या तीन खेळाडूंना रिटेन केले होते. त्यानंतर त्यांनी ऑक्शनच्या दोन दिवसांमध्ये उर्वरित टीम निश्चित केली आहे. विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडल्यानंतर आरसीबीचा कॅप्टन कोण होणार हा मुख्य प्रश्न आहे. आरसीबीनं नवा कॅप्टन कोण हे अद्याप जाहीर केलेलं नाही. मात्र त्याचे स्पष्ट संकेत ऑक्शनमधून मिळाले आहेत. आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी बॅटर फाफ ड्यू प्लेसिसला (Faf du Plessis) यंदा खरेदी केले आहे. ड्यू प्लेसिसला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलचा मोठा अनुभव आहे. तो आता कॅप्टनपदासाठी प्रबळ दावेदार आहे. आरसीबीनं श्रीलंकेचा स्पिनर हसरंगाला 10 कोटी 75 लाख रूपये मोजून खरेदी केले. त्याचबरोबर त्यांनी मागील आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलचाही हसरंगा इतक्याच किंमतीमध्ये टीममध्ये समावेश केला आहे. वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर रदरफोर्ड आणि न्यूझीलंडचा बॅटर फिन अॅलन आगामी सिझनमध्ये आरसीबीकडून खेळतील. आरसीबीनं फास्ट बॉलिंग देखील यंदा मजबूत केली आहे. जोश हेजलवूड आणि जेसन बेहड्रॉफ हे अनुभवी फास्ट बॉलर्स आता आरसीबीकडे आहेत. IPL Auction 2022 : धोनीच्या चेन्नईचे नवे ‘किंग्स’ कोण? पाहा CSK ची संपूर्ण टीम भारतीय खेळाडूंमध्ये अनुभवी दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) आरसीबीमध्ये पुनरागमन झालं आहे. कार्तिकसह अनुज रावत हा आणखी एक विकेट किपर आरसीबकडे आहे. त्याचबरोबर महिपाल लोमरोर आणि शाहबाज अहमद या ऑल राऊंडरलाही आरसीबीने करारबद्ध केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम : विराट कोहली (कॅप्टन) फाफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, फिन अॅलन, अनुज रावत, महिपाल लोमरोर, सुयश प्रभूदेसाई, रदरफोर्ड, हसरंगा, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, आकाशदीप, अनिश्वर गौतम, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, चमा मिलिंद, जोश हेजलवूड, जेसन बेहरनड्रॉफ, सिद्धार्थ कौल, लवनिथ सिसोदीया, डेव्हिड विली