JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : राजस्थान रॉयल्स लिलावासाठी सज्ज, संजूनं सांगितला टीमचा प्लॅन

IPL Auction 2022 : राजस्थान रॉयल्स लिलावासाठी सज्ज, संजूनं सांगितला टीमचा प्लॅन

राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी : राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. आता आगामी सिझनपूर्वी (IPL 2022) होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी राजस्थानची टीम सज्ज झाली आहे. हे ऑक्शन आपल्या टीमसाीठी अत्यंत महत्त्वाचं आहे, असा दावा टीमचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) केला आहे. आयपीएल मेगा ऑक्शनसाठी (IPL Mega Auction 2022) राजस्थानकडे 62 कोटींचे बजेट आहे. टीमनं संजू सॅमसन (14 कोटी),  जोस बटलर (10 कोटी) आणि यशस्वी जैयस्वाल (4 कोटी) या तीन जणांना रिटेन केले आहे. तर बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, ख्रिस मॉरीस आणि डेव्हिड मिलर या दिग्गजांना या ऑक्शनपूर्वी रिलीज केले आहे. मागील आयपीएलमध्ये राजस्थानची कामगिरी चांगली झाली नाही. टीमनं 14 पैकी फक्त 5 मॅच जिंकल्या होत्या. त्यामुळे टीम पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर होती.त्यामुळे आगामी सिझनमध्ये राजस्थानची टीम नव्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कॅप्टन संजू सॅमसननं यावर सांगितलं की, ‘आम्ही लिलावात समावेश असणाऱ्या सर्व खेळाडूंवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला टॉपवर जाण्यासाठी मदत करणाऱ्या खेळाडूंना करारबद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करू.’ IND vs WI : कधी सुरू होणार तिसरी वन-डे? Live Streaming कुठे पाहाल? राजस्थान रॉयल्सनं आजवर नेहमीच बड्या खेळाडूंपेक्षा नवोदीत आणि उपयुक्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर भर दिला आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संगकारा आता टीमचा डायरेक्टर आहे. संगकारानं या लिलावाबद्दल सांगितलं की, ‘आम्ही सविस्तर पद्धतीने खेळाडूंचे विश्लेषण केले आहे. खेळाडूंच्या माहितीचा एकत्रित डेटाबेस आमच्याकडे आहे. आम्ही त्याचे योग्य विश्लेषण करत आहोत. ही एक अतिशय मोठी प्रक्रिया आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या