अहमदाबाद, 30 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) या दिग्गज बॅट्समनचा समावेश असलेल्या मॅचमध्ये पंजाबच्या हरप्रीत बरार (Harpreet Brar) या 25 वर्षांच्या स्पिनरनं गाजवली. त्यानं विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) या तिघांनाही आऊट केलं. हरप्रीतनं आरसीबीच्या इनिंगमधील 11 व्या ओव्हरमध्ये सर्वात प्रथम विराट कोहलीला 35 रनवर आऊट केलं. त्यानंतर लगेच पुढच्याच बॉलवर ग्लेन मॅक्सवेलला शून्यावर आऊट केल. डीव्हिलियर्सनं हरप्रीतची हॅट्ट्रिक चुकवली. मात्र तो देखील त्याच्यापुढे फार काळ टिकू शकला नाही. हरप्रीतनं पुढच्याच ओव्हरमध्ये डीव्हिलियर्सला 3 रनवर आऊट करत आरसीबीला तिसरा मोठा धक्का दिला.
बॅटींगमध्येही केली कमाल हरप्रीत या सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळत होता. तो सातव्या क्रमांकावर बॅटींगला आला तेंव्हा पंजाबची अवस्था 5 आऊट 118 होती. त्यानं कॅप्टन के.एल. राहुलसोबत नाबाद 61 रनची पार्टरनरशिप केली. यामध्ये हरप्रीतनं फक्त 17 बॉलमध्ये नाबाद 1 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं नाबाद 25 रन काढले. कोण आहे हरप्रीत? पंजाबमधील मोगा हे हरप्रीतचे गाव आहे. त्याला 2019 साली पंजाब किंग्जनं सर्वप्रथम करारबद्ध खेळला. तो त्या सिझनमध्ये फक्त 2 मॅच खेळला. त्यानंतर मागील सिझनमध्ये (IPL 2020) तर त्याला फक्त 1 मॅच खेळायला मिळाली. या आयपीएलमध्येही त्याची पहिलीच मॅच आहे. यापूर्वीच्या 3 आयपीएल मॅचमध्ये हरप्रीतला एकही विकेट मिळाली नव्हती. दोन वर्षानंतर त्याची आयपीएलमध्ये विकेट घेण्याची क्षमता संपली आणि त्यानं पहिल्याच मॅचमध्ये आयपीएलमधील तीन मोठ्या बॅट्समन्सना आऊट केलं.