JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : ‘त्याचा उत्साह मारु नका’ अर्जुन तेंडुलकरच्या ट्रोलर्सना बॉलीवूडमधून उत्तर

IPL 2021 : ‘त्याचा उत्साह मारु नका’ अर्जुन तेंडुलकरच्या ट्रोलर्सना बॉलीवूडमधून उत्तर

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा प्रथमच आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) सहभागी झाला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 फेब्रुवारी : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा प्रथमच आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) सहभागी झाला होता. चेन्नईमध्ये झालेल्या या लिलावात अर्जुनला त्याच्या ब्रेस प्राईजमध्ये मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) खरेदी केलं. अर्जुनची निवड होताच त्याचं सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरु आहे. अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकर यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत. त्यांचा मुलगा म्हणून अर्जुनला ही संधी मिळाली असं काही जणांचं मत आहे. अर्जुनच्या या ट्रोलर्सना आता बॉलिवूडमधून उत्तर मिळालं आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) या विषयावर अर्जुनचा बचाव करत त्याच्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे. फरहाननं ट्विटरवरुन त्याचं या विषयावरचं मत व्यक्त केलं आहे. ‘मला अर्जुन तेंडुलकरबद्दल बोललं पाहिजे. आम्ही अनेकदा एकत्र जिममध्ये असतो. तो त्याच्या फिटनेसवर किती मेहनत घेतो हे मी पाहिलं आहे. एक चांगला क्रिकेटपटू होण्याचं त्याचं ‘लक्ष्य’ आहे. त्याच्यासाठी घराणेशाही हा शब्द अयोग्य आणि क्रूर आहे. त्याची सुरुवात होण्यापूर्वीच त्याच्या उत्साहाची हत्या करु नका. त्याला या पद्धतीनं खाली खेचू नका.’ असं आवाहन फरहाननं केलं आहे.

संबंधित बातम्या

मुंबई इंडियन्सचे कोच काय म्हणाले? मुंबई इंडियन्सचे कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी अर्जुनची निवड का केली याचं कारण सांगितलं आहे. अर्जुनला त्याच्या कौशल्यावर आणि प्रतिभेवर टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. तो सचिनचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर मोठा शिक्का असणार आहे, पण नशिबाने तो बॉलर आहे, त्यामुळे आपण अर्जुनसारखी बॉलिंग करू शकलो, तर सचिनलाच याचा अभिमान वाटेल,’ असं जयवर्धने म्हणाला. ( वाचा : ‘ मी तर लहानपणापासून…’ मुंबई इंडियन्सनं निवडताच अर्जुनची भावुक प्रतिक्रिया, VIDEO ) ‘अर्जुनसाठी ही शिकण्याची संधी असेल. मुंबईसाठी त्याने नुकतंच खेळायला सुरूवात केली आहे, आता तो फ्रॅन्चायजीसाठी खेळेल. तो अजून लहान आहे, त्यामुळे त्याची प्रगती होईल. आम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल, तसंच त्याच्यावर दबाव टाकून चालणार नाही.’ अशी प्रतिक्रिया महेला जयवर्धनेनं दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या