नवी दिल्ली, 24 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशभर गंभीर परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. देशाची राजधानी दिल्ली (Delhi) ही कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महानगरापैकी एक आहे. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना बेड्स कमी पडत असून ऑक्सिजनचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या परिस्थितीमध्ये दिल्लीत आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) सामने कसे होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबई इंडियन्स (MI), चेन्नई सुपर किंग्स (CSK), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या चार संघांचे 8 सामने दिल्लीमध्ये होणार आहेत. दिल्लीतील सामन्यांना 28 एप्रिलपासून सुरुवात होणार असून त्यासाठी सर्व संघ 26 एप्रिलपर्यंत दिल्लीत दाखल होणार आहेत. कसे होणार सामने? दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानाचे प्रभारी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशननं (DDCA) आयपीएलचे सर्व सामने सुरक्षित वातावरणात होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘इनासाईड स्पोर्ट्स ’ नं दिलेल्या वृत्तानुसार DDCA चे अध्यक्ष रोहन जेटली यांनी आयपीएलचे सर्व सामने बायो-बबलमध्ये होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बायो-बबल संपूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचा भाग नसलेल्या कोणत्याही सदस्याला स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. ग्राऊंड स्टाफसह सर्व संबंधित व्यक्ती या बायो बबलचा भाग आहेत, असं जेटली यांनी सांगितलं. पुणेकरांसाठी भज्जीचा पुढाकार, अधिकाधिक कोरोना चाचण्या होण्यासाठी केली मोलाची मदत दिल्लीत चार संघांचे सामने होणार आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्सनं 5 पैकी 2 सामने जिंकले असून ते पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं 4 पैकी 3 सामने जिंकले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीमध्ये खेळणारी तिसरी टीम सनरायझर्स हैदराबाद 4 पैकी एक मॅच जिंकून सहाव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान 4 पैकी एक मॅच जिंकून शेवटच्या क्रमांकावर आहे.