JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021: ब्राव्होच्या मित्राचा CSK मध्ये समावेश, टीमला चॅम्पियन करण्याचा आहे अनुभव!

IPL 2021: ब्राव्होच्या मित्राचा CSK मध्ये समावेश, टीमला चॅम्पियन करण्याचा आहे अनुभव!

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर डोमिनिक ड्रेक्सचा चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) टीममध्ये उर्वरित आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) समावेश करण्यात आला आहे. चेन्नईचा ऑलराऊंडर सॅम करन जखमी झाल्यानं त्याची निवड झाली आहे.

0106

मुंबई, 7 ऑक्टोबर : वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर डोमिनिक ड्रेक्सचा चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) टीममध्ये उर्वरित आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) समावेश करण्यात आला आहे. चेन्नईचा ऑलराऊंडर सॅम करन जखमी झाल्यानं त्याची निवड झाली आहे. (फोटो -dommie48)

जाहिरात
0206

आयपीएल मॅचच्या दरम्यान कंबरेला दुखापत झाल्यानं सॅम करन उर्वरित आयपीएल स्पर्धा तसंच आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) खेळणार नाही. (samcurran58)

जाहिरात
0306

डाव्या हातानं बॅटींग आणि बॉलिंग करणाऱ्या ड्रेक्सनं आत्तापर्यंत 1 फर्स्ट क्लास, 25 लिस्ट ए आणि 19 टी20 मॅच खेळल्या आहेत. त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची प्रतीक्षा आहे. ( फोटो -dommie48)

जाहिरात
0406

ड्रेक्सनं आजवर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2, लिस्ट ए मध्ये 26 आणि टी20 मॅचमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच तो उपयुक्त बॅटर देखील आहे. त्यानं टी20 क्रिकेटमध्ये 9 इनिंगमध्ये 153 रन केले असून त्याचा स्ट्राईक रेट 160 आहे. (फोटो - dommie48)

जाहिरात
0506

सीपीएल 2021 च्या फायनलमध्ये ड्रेक्सच्या खेळामुळेच सेंट किट्सनं विजय मिळवला होता. त्या मॅचमध्ये ड्रेक्सनं 24 बॉलमध्ये नाबाद 48 रनची खेळी केली. तसंच एक विकेटही घेतली होती. या कामगिरीमुळे त्याचा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. (फोटो -dommie48)

जाहिरात
0606

ड्रेक्सला गुरुवारी पंजाब किंग्ज विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. (फोटो -dommie48)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या