JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : 'ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता', दिग्गज क्रिकेटपटूचा निशाणा

IPL 2020 : 'ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता', दिग्गज क्रिकेटपटूचा निशाणा

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चांगली सुरुवात केलेल्या दिल्ली (Delhi Capitals)ची कामगिरी अचानक ढासळली. ऋषभ पंत (Rishabh Pant) फॉर्ममध्ये नसणं हे दिल्लीच्या पराभवाचं कारण ठरलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 2 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चांगली सुरुवात केलेल्या दिल्ली (Delhi Capitals)ची कामगिरी अचानक ढासळली. मागच्या 4 मॅच गमावल्यामुळे दिल्लीने स्वत:चा प्ले-ऑफसाठीचा सोपा रस्ता आणखी कठीण करुन ठेवला. आता दिल्लीला बँगलोरविरुद्ध करो या मरोचा सामना खेळावा लागणार आहे. या मॅचमध्ये त्यांचा विजय झाला तर ते प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील, पण जर त्यांना हा सामना गमवावा लागला, तर मात्र त्यांना मुंबई आणि हैदराबादच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. दिल्लीच्या यंदाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं ते त्यांचा मॅच विनर ऋषभ पंत (Rishabh Pant)याचा ढासळलेला फॉर्म. ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर आणि दिग्गज प्रशिक्षक टॉम मूडी यांनी ऋषभ पंत याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. क्रिकइन्फोशी बोलत असताना टॉम मूडी म्हणाले की यंदाच्या वर्षी ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता. लॉकडाऊन दरम्यान ऋषभ पंतने त्याच्या फिटनेसवर काम केलं नाही, त्यामुळे पंतचा खेळ प्रभावित झाला. तसंच त्याला आयपीएलदरम्यानच दुखापतही झाली, ही दुखापतही खराब फिटनेसमुळे झाल्याचं मूडी म्हणाले. ‘लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच आव्हानांचा सामना करावा लागला, पण हे कारण असू शकत नाही, आपण 70 आणि 80 च्या दशकातलं क्रिकेट खेळत नाही,’ असा टोला मूडी यांनी लगावला. ऋषभ पंतने विराट कोहलीकडून फिटनेसबाबत शिकावं, असा सल्लाही टॉम मूडी यांनी दिला. ‘भारतीय टीमकडे विराट कोहलीचं उदाहरण आहे, ज्याने आपला फिटनेस सर्वोत्कृष्ट करून दाखवला, त्यामुळे पंत कारण देऊ शकत नाही. पंत फक्त शारिरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही ट्रॅक वरुन उतरला आहे. यानंतर त्याला दुखापत झाली. खराब फिटनेस हेच त्याच्या दुखापतीचं कारण आहे,’ अशी प्रतिक्रिया मूडी यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या