JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : धोनीसोबतचा 4 वर्षांचा प्रवास, ऋतुराज गायकवाडने शेयर केल्या आठवणी

IPL 2020 : धोनीसोबतचा 4 वर्षांचा प्रवास, ऋतुराज गायकवाडने शेयर केल्या आठवणी

IPL 2020 चेन्नई (CSK)च्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) धोनी (MS Dhoni) सोबतचा 4 वर्षांचा प्रवास शेयर करताना भावुक झाला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 5 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली. धोनी (MS Dhoni)च्या नेतृत्वात पहिल्यांदाच चेन्नईला आयपीएलची प्ले-ऑफ गाठता आली नाही. 8 टीमच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सातव्या क्रमांकावर राहिली. पण चेन्नईला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)च्या रुपात भविष्यातला स्टार खेळाडू मिळाला. आयपीएल सुरू व्हायच्या काही दिवस आधीच ऋतुराजला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर ऋतुराज मैदानात उतरला, पण सुरुवातीला संघर्ष करावा लागला. यानंतर त्याला बाहेर बसवण्यात आलं. सुरुवातीच्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये ऋतुराज शून्यवर आऊट झाला, तर तिसऱ्या मॅचमध्ये त्याला फक्त 5 रन बनवता आले. यानंतर त्याने लागोपाठ 3 अर्धशतकं केली, यातल्या 2 वेळा तो नाबाद राहिला. सुरुवातीच्या 3 मॅचमध्ये अपयशी ठरल्यानंतर धोनीने ऋतुराजशी आयुष्याबाबत चर्चा केली. धोनीसोबतच्या या बोलण्यानंतर ऋतुराजला प्रेरणा मिळाली. बुधवारी ऋतुराजने धोनीसोबतचा 4 वर्षांचा आपला प्रवास सोशल मीडियावर शेयर केला. यातल्या एका फोटोमध्ये ऋतुराजच्या हाताला प्लास्टर लावलं होतं. धोनीने याच प्लास्टरवर सही केली होती, तर दुसऱ्या फोटोमध्ये ऋतुराज धोनीसोबत बॅटिंग करत आहे. ऑक्टोबर 2016 साली ऋतुराज धोनीला पहिल्यांदा भेटला होता. आपल्या पदार्पणाच्या रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्येच ऋतुराजचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर झारखंडचा मेंटर असलेला धोनी स्वत:हून ऋतुराजकडे आला आणि त्याला दुखापतीबाबत विचारलं. ऑक्टोबर 2020 साली 3 वेळा अपयशी ठरल्यानंतर धोनी पुन्हा एकदा स्वत:हून ऋतुराजकडे गेला आणि त्याच्याशी आयुष्याबाबत बोलला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या