ब्रिस्टल, 28 जून : भारताची सर्वात तरुण ओपनर शफाली वर्मानं (Shafali Verma) इंग्लंड विरुद्ध रविवारी झालेल्या मॅचमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शफालीनं पदार्पण करताच नव्या इतिहासाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात पदार्पण करणारी शफाली ही सर्वात कमी वयाची भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) याबाबतचा रेकॉर्ड शफालीनं मोडला. शफालीला पहिल्या वन-डेमध्ये कमाल करता आली नाही. ती फक्त 15 रन काढून आऊट झाली. या मॅचच्या दरम्यान तिच्या बाबतीत एक मोठी चूक ब्रॉडकास्टर्सनी केली. त्यामुळे भारतीय फॅन्स चांगलेच नाराज झाले. शफाली ही 17 वर्षांची आहे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पण मॅचच्या दरम्यान तिचं वय चक्क 28 दाखवण्यात आले. टीव्ही ब्रॉडकास्टर्सनी ही चूक तातडीनं सुधारली. पण शफालीचं वय 11 वर्षांनी वाढवण्यात आल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला. नेटीझन्सनी यावेळी बीसीसीआयला देखील प्रश्न विचारले.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतीय महिला टीमचा (India vs England) दारूण पराभव झाला. भारताने ठेवलेल्या 202 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 34.5 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केला. इंग्लंडकडून टॅमी ब्यूमॉन्टने सर्वाधिक 87 रनची नाबाद खेळी केली, तर नेताली स्किव्हर 74 रनवर नाबाद राहिली. भारताकडून झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) आणि एकता बिष्ट (Ekta Bisht) यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आफ्रिकेनं 24 तासामध्ये हिशोब चुकवला, पंजाबच्या खेळाडूची 5 बॉलमध्ये 30 रनची खेळी व्यर्थ भारताकडून मिथाली राजने (Mithali Raj) सर्वाधिक 72 रन केले, तर पूनम राऊतने (Poonam Raut) 32 आणि दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 30 रनची खेळी केली. इंग्लंडकडून एकेलस्टोनला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या