जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली (Virat Kohli) दुसरी टेस्ट खेळणार नाही. विराटच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कॅप्टन असेल. विराट कोहली अनफिट आहे, त्यामुळे तो दुसरी टेस्ट खेळू शकणार नाही. टीम इंडियाचे फिजिओ त्याच्यावर उपचार करत आहेत. तो तिसऱ्या टेस्टपूर्वी फिट होईल असे राहुलने टॉसच्या दरम्यान सांगितले. विराटच्या अनुपस्थितीमध्ये हनुमा विहारीचा (Hanuma Vihari) टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे दौऱ्यापूर्वीच आऊट झाला होता. त्यानंतर आता विराटही दुसरी टेस्ट खेळणार नाही. या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल पहिल्यांदाच टेस्ट टीमची कॅप्टनसी करणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी राहुल कॅप्टन असल्याची घोषणा आधीच झालेली आहे.
राहुलने टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून पहिल्याच मॅचमध्ये टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. तीन टेस्टच्या या सीरिजमधील पहिली टेस्ट टीम इंडियाने जिंकली असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय टीम केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज