कोलंबो, 23 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या वन-डे चा खेळ पावसाच्या अडथळ्यानंतर पुन्हा सुरू झाला. पावसामुळे ही वन-डे 47 ओव्हर्सची करण्यात आली आहे. पावसानंतर खेळ सुरू होताच टीम इंडियाला चौथा धक्का बसला. मनिष पांडे (Manish Pandey) 11 रन काढून आऊट झाला. त्याला जयविक्रमानं आऊट केलं. टीम इंडियाचा मिडल ऑर्डरचा बॅट्समन असलेल्या मनिष पांडेला या मालिकेत चांगली कामगिरी करत टीममध्ये जागा निश्चित करण्याची मोठी संधी होती. पांडे यामध्ये अपयशी ठरला. त्याने तीन सामन्यात 34 रनच करता आले. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये पांडेला टीममध्ये जागा मिळाली होती. पहिल्या दोन सामन्यातील अपयशानंतरही त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली. मात्र तो पुन्हा एकदा फ्लॉप झाल्यानं आता त्याला पुन्हा वन-डे सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही, असं मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर पांडेला चांगलंच ट्रोल करण्यात येत असून सोशल मीडियावर मीम्स (Memes) पाऊस पडला आहे.
IND vs SL : स्पिनच्या जाळ्यात टीम इंडियाची शिकार, 4 ओव्हरमध्ये बदलली परिस्थिती मनिषची कारकिर्द मनिष पांडेनं 28 वन-डे सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकासह 555 रन केले आहेत. तर 39 टी 20 सामन्यांमध्ये 126.15 च्या स्ट्राईक रेटनं 709 रन केले आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असतील त्यावेळी आता पांडेला संधी मिळण्याची शक्यता अवघड आहे.