नवी दिल्ली, 11 जुलै: इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 (INDW vs ENGW T2O) सामन्यात भारतीय क्रिकेटर हरलीन देओलच्या जबरदस्त कॅचचं (Harleen Deol Catch) प्रत्येक जण कौतुक करत आहे. हा या वर्षातील सर्वश्रेष्ठ कॅच असल्याचं सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) जाहीर केलं आहे. हरभजन सिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या क्रिकेटपटूंनीही हरलीनची प्रशंसा केली आहे. त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील हरलीनच्या जबरदस्त कॅचची दखल घेतली आहे. हरलीननं शुक्रवारी झालेल्या टी 20 सामन्यात इंग्लंडच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर बाऊंड्रीच्या जवळ हा थरारक कॅच घेतला. इंग्लंडची विकेट किपर एमी जोन्सनं (Ami Jones) सिक्स मारण्याच्या उद्देशानं तो बॉल टोलावला होता. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर हरलीनच्या कॅचचा व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये त्यांनी हरलीनला टॅग करत अद्भुत, खूप सुंदर, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिखा पांडेच्या बॉलिंगवर एमी जोन्सनं लगावलेला तो फटका सहज बाऊंड्रीच्या पार जाईल असा सर्वांचा अंदाज होता. पण, हरलीनच्या मनात काही तरी वेगळे होते. हरलीननं कॅच पकडण्यासाठी हवेत उडी मारली. तिच्यात आणि बाऊंड्री लाईनमध्ये काही सेंटीमीटरचेच अंतर होते. त्यावेळी तिने बॉल वर फेकला आणि बाऊंड्री लाईनच्या बाहेर उडी मारली. त्यानंतर डोळ्याचं पात लवण्याच्या आत हरलीननं आतमध्ये उडी मारत हवेत तो कॅच पकडला.
इंग्लंडच्या बी टीमकडून पाकिस्तानचा पुन्हा पराभव, 47 वर्षांचा लाजिरवाणा इतिहास कायम भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना रविवारी होणार आहे. भारताने पहिला सामना गमावल्यानंतर मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे.