JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Breaking News :टीम इंडियाची मँचेस्टर टेस्टमधून माघार, पाचवी टेस्ट रद्द

Breaking News :टीम इंडियाची मँचेस्टर टेस्टमधून माघार, पाचवी टेस्ट रद्द

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या टेस्टबाबत (India vs England 5th test) मोठी बातमी आहे.टीम इंडियानं मँचेस्टर टेस्टमधून माघार घेतली आहे. भारतीय टीमनं माघार घेतल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) जाहीर केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मँचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या टेस्टबाबत (India vs England 5th test) मोठी बातमी आहे.टीम इंडियानं मँचेस्टर टेस्टमधून माघार घेतली आहे. भारतीय टीमनं माघार घेतल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) जाहीर केलं आहे.यापूर्वी टीम इंडियानं मँचेस्टर टेस्ट सोडली असून ही सीरिज 2-2 नं बरोबरीत सुटल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डानं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर इसीबीनं तो परिच्छेद त्यांच्या पत्रकातून हटवला आहे. पाचव्या टेस्टचा अद्याप कोणताही निकाल जाहीर झालेला नाही. टीम इंडिया या सीरिजमध्ये सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. पुढील वर्षी भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्यावेळी पाचवी टेस्ट घेण्याचा विचार सध्या सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मँचेस्टर टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या फिजिओला कोरोनाची लागण झाल्यानं बदललेल्या परिस्थितीमध्ये भारतानं ही टेस्ट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी  आज खेळ नाही, ओके टाटा बाय-बाय असं मोजक्या शब्दात कार्तिकनं ट्विट केलं. कार्तिकनं या सीरिजमध्ये कॉमेंट्रीही केली आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन यानं देखील मँचेस्टर टेस्ट रद्द झाल्याचं म्हंटलं आहे. त्यापाठोपाठ इंग्लंड क्रिकेट बोर्डानंही ही टेस्ट रद्द झाल्याचं जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या

टीम इंडियाच्या  सिनिअर खेळाडूनं मॅचच्या दरम्यान कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती आणखी खराब होईल अशी चिंता व्यक्त केली होती. पाच टेस्टच्या या मालिकेत टीम इंडियाकडं 2-1 अशी आघाडी होती. भारतीय टीमनं लॉर्ड्स आणि ओव्हलवर झालेल्या टेस्ट जिंकल्या. तर इंग्लंडनं हेडिंग्ले टेस्टमध्ये विजय मिळवला होता. तर नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या