ओव्हल, 4 सप्टेंबर : भारताविरुद्ध ओव्हल टेस्टमध्ये (India vs England, 4th Test) इंग्लंडनं 99 रनची आघाडी घेतली. ओली पोप, जॉनी बेअरस्टो, मोईन अली आणि ख्रिस वोक्स यांच्या बॅटींगमुळे इंग्लंडला ही आघाडी मिळाली. इंग्लंडची अवस्था 5 आऊट 62 होती. त्यानंतर पोप-बेअरस्टो आणि पोप-मोईन अली यांनी पार्टनरशिप करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. यावेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) केलेल्या एका चुकीचा फटका टीम इंडियाला बसला. इंग्लंडच्या इनिंगमधील 60 व्या ओव्हरमध्ये बुमराहनं मोईन अलीला जबरदस्त यॉर्कर टाकला होता. तो बॉल मोईनच्या पॅडला टाकला. यावेळी बुमराहसह कुणीही अपील केले नाही. त्यानंतर रिप्लेमध्ये तो lBW असल्याचं स्पष्ट दिसत होतं. मोईन अलीच्या बॅटला बॉल लागला असा बुमराहसह संपूर्ण टीमचा समज झाला होता. पण बॉल आधी मोईनच्या पॅडला लागला होता.
मोईन अलीनं या जीवदानाचा फायदा घेतला. त्याने 35 रनची खेळी केली. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या क्रिस वोक्सने (Chris Woakes) 50 रन केले. भारताकडून उमेश यादवने (Umesh Yadav) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. IND VS ENG: रोहित शर्माचा आणखी एक मोठा रेकॉर्ड, सचिन-द्रविडच्या लिस्टमध्ये समावेश या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताने या मॅचसाठी टीममध्ये दोन बदल केले. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्याऐवजी शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. 5 टेस्ट मॅचची ही सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.