JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Happy Birthday Ganguly: गांगुली-कॉनवेमध्ये एकाच दिवशी वाढदिवसासह 6 योगायोग, वाचून व्हाल हैराण

Happy Birthday Ganguly: गांगुली-कॉनवेमध्ये एकाच दिवशी वाढदिवसासह 6 योगायोग, वाचून व्हाल हैराण

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि न्यूझीलंडचा ओपनिंग बॅट्समन डेवॉन कॉनवे (Devon Conway) या दोघांचा आज (8 जुलै) रोजी वाढदिवस आहे. गांगुली आणि कॉनवेमध्ये विश्वास बसणार नाही इतकं साम्य आहे.

0106

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा आज (8 जुलै) वाढदिवस आहे. न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये ऐतिहासिक पदार्पण करणाऱ्या डेवॉन कॉनवेचा (Devon Conway) देखील आजच्या दिवशी वाढदिवस आहे. गांगुली आणि कॉनवे या दोघांची जन्मतारीख 8 जुलै आहे. गांगुलीचा जन्म 8 जुलै 1972 रोजी झाला. तर कॉनवेचा जन्म 8 जुलै 1991 रोजी झाला आहे. या दोघांमध्ये फक्त वाढदिवस नाही तर अनेक बाबतीमध्ये समानता आहे.

जाहिरात
0206

डेवॉन कॉनवे याने पदार्पणाच्या टेस्टमध्येच शतक केलं आहे. या शतकाबरोबरच कॉनवेनं टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गांगुलीने 1996 साली लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पणात शतक झळकावले होते.

जाहिरात
0306

डेव्हन कॉनवे हा देखील सौरव गांगुली प्रमाणे डावखुरा बॅट्समन आहे.

जाहिरात
0406

सौरव गांगुली आणि डेव्हन कॉनवे या दोघांनीही वेस्ट इंडिज विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले

जाहिरात
0506

गांगुली आणि कॉनवे या दोघांनीही इंग्लंड विरुद्धच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

जाहिरात
0606

सौरव गांगुली भारताकडून वन-डे मध्ये पदार्पण करणारा 84 वा खेळाडू आहे. तर डेव्हन कॉनवे हा न्यूझीलंडकडून टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 84 वा खेळाडू आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या