टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) यानं काही दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. लग्नानंतर दोन दिवसांनीच तो पत्नीला सोडून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.
मुंबई, 24 नोव्हेंबर: टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) यानं काही दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. लग्नानंतर 2 दिवसांनीच उन्मुक्त पत्नीला सोडून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. (PC-Unmukt Chand Instagram)
उन्मुक्तनं वयाच्या 28 व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे. (PC-Unmukt Chand Instagram)
उन्मुक्त लग्नासाठी भारतामध्ये आला होता. लग्न झाल्यानंतर 2 दिवसांमध्येच तो बिग बॅश लीग क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.
उन्मुक्त बीबीएल टीम मेलबर्न रेनग्रेड्स टीमचा सदस्य आहे. तो या स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय आहे.