मुंबई, 19 जुलै : इंग्लंडने दुसऱ्या टी20 मध्ये पाकिस्तानचा 45 रननं पराभव करत मालिकेमध्ये बरोबरी साधली आहे. इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) अनुपस्थितीमध्ये इंग्लंडचं नेतृत्त्व करणाऱ्या जोस बटलरनं (Jos Buttler) सर्वात जास्त 59 रन काढले. या सामन्यात इंग्लंडच्या लियम लिविंगस्टननं (Liam Livingstone) मारलेला सिक्स पाहून पाकिस्तानच्या टीमचा आत्मविश्वासच हरवला. राजस्थान रॉयल्सचा सदस्य असलेल्या लिविंगस्टननं हॅरिस रऊफच्या बॉलिंगवर हा सिक्स मारला. त्याने मारलेला सिक्स हेडिंग्लेतील मैदानाच्या बाहेर पडला. या सिक्सची लांबी 122 मीटर होती. लिविंगस्टननं पहिल्या टी20 सामन्यात शतक केले होते. दुसऱ्या सामन्यात देखील त्याने तो फॉर्म कायम ठेवत आक्रमक खेळी केली. लिविंग्स्टननं 16 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हा सिक्स लगावला. हॅरिसच्या ओव्हरपिच बॉलवर त्याने क्रिझमध्ये उभं राहतचं सिक्स मारला. तो हेडिंग्लेच्या तिसऱ्या मजल्यावरुन थेट रग्बीच्या मैदानात जाऊन पडला. त्यानंतर लिंगस्टोननं पुढच्या बॉलवर एक चौकार लगावला. त्यावेळी तो आणखी एक मोठी खेळी करणार असे वाटत होते. पण, पुढच्याच बॉलवर टॉम करननं केलेल्या चुकीच्या कॉलमुळे तो रन आऊट झाला. आऊट होण्यापूर्वी लिविंगस्टननं 23 बॉलमध्ये दोन फोर आणि तीन सिक्सच्या मदतीनं 38 रन काढले.
IND vs ENG : इंग्लंडमध्ये असलेला रोहित शर्मा बनला कॉमेंटेटर, म्हणाला… इंग्लंडचा 55 रननं विजय इंग्लंडनं कॅप्टन जोस बटलर (59), मोईन अली (36) आणि लियम लिविंगस्टन (38) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर विजयासाठी 201 रनचं लक्ष्य ठेवलं. पाकिस्तानला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची टीम निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 155 रनच करू शकली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 20 जुलै रोजी होणार आहे.