ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातामध्ये मृत्यू (Andrew Symonds Died) झाला आहे. तो 46 वर्षांचा होता. आक्रमक ऑल राऊंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायमंड्टी कारकिर्द तितकीच वादग्रस्त ठरली.
मुंबई, 15 मे : ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. कार अपघातानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यावेळी त्याची परिस्थिती नाजूक होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण ते प्रयत्न दुर्दैवानं अपयशी ठरले. (Insta Photo)
ऑस्ट्रेलियाकडून 26 टेस्ट आणि 198 वन-डे सामने खेळणाऱ्या सायमंड्सनं क्रिकेट विश्वावर मोठा ठसा उमटवला. तो 1999 ते 2007 या कालावधीमध्ये क्रिकेट विश्वावर एकछत्री राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा सदस्य होता. (Photo CA)
सायमंड्सनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 शतक आणि 10 अर्धशतकांसह 1462 रन केले. तर वन-डेमध्ये 6 शतक आणि 30 अर्धशतकांच्या मदतीनं 5088 रन त्याने काढले. (Insta Photo)
सायमंड्स बॅटींगसह मध्यमगती बॉलिंग आणि ऑफ स्पिन देखील करत असे. त्याच्या नावावर टेस्टमध्ये 24 आणि वन-डेमध्ये 133 विकेट्स आहेत. (Insta Photo)
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2008 साली सिडनीमध्ये झालेली टेस्ट सायमंड्सच्या कारकिर्दीत वादग्रस्त ठरली. त्या टेस्टमध्ये हरभजन सिंगनं आपल्या विरोधात वांशिक शेरेबाजी केल्याचा आरोप सायमंड्सनं केला होता. क्रिकेट विश्वात हे प्रकरण 'मंकीगेट' म्हणून ओळखले जाते. (Insta Photo)
सायमंड्सनं ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा सामना मे 2009 साली खेळला. त्यानंतर महिनाभरानी दारू पिणे आणि अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला टी20 वर्ल्ड कपममधून घरी पाठवण्यात आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याच्यासोबतचा करारही रद्द केला. त्यानंतर सायमंड्स कधीही ऑस्ट्रेलियाकडून खेळला नाही. (Photo by Cricket Australia)
सायमंड्सच्या अकाली मृत्यूचा जगभरातील क्रिकेट फॅन्सना धक्का बसला आहे. रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांच्यानंतर आणखी एका ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटू यावर्षी काळाच्या पडद्याआड गेला आहे. (Twitter Image)
'हा आमच्यासाठी दु:खद दिवस आहे,' अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मार्क टेलरनं व्यक्त केली आहे. 'सायंंड्सचं क्रिकेट मैदानात आणि बाहेर खास नातं होतं,' असं पाकिस्तानचा माजी फस्ट बॉलर शोएब अख्तरनं म्हंटलंय. तर हे सत्य पचवणं अवघड असल्याची भावना माजी ऑस्ट्रेलियन विकेट किपर अॅडम गिलख्रिस्टनं व्यक्त केलीय. (Photo by Mumbai Indians)