JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / जोडी नंबर 1: नवरा-बायको दोघंही ठरले वर्षातील बेस्ट क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील अनोखा योग

जोडी नंबर 1: नवरा-बायको दोघंही ठरले वर्षातील बेस्ट क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील अनोखा योग

फास्ट बॉलर मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठेचा अ‍ॅलन बॉर्डर पुरस्कार मिळाला आहे. तर ‘वन-डे क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारात स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हिली यांनी बाजी मारली आहे.

0106

मुंबई, 29 जानेवारी : फास्ट बॉलर मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठेचा अ‍ॅलन बॉर्डर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पाचवा फास्ट बॉलर आहे. या पुरस्कारासाठी स्टार्क आणि मिचेल मार्श यांच्यात जोरदार चुरस होती. त्यामध्ये अखेर स्टार्कनं बाजी मारली आहे. (Alyssa Healy instagram)

जाहिरात
0206

मतदानाच्या आधारावर या पुरस्कार विजेत्या खेळाडूची निवड करण्यात येते. यामध्ये स्टार्कला 107 तर मार्शला 106 मत मिळाली. ट्रेविस हेडला 72 मतं पडली. (Mitchell Starc instagram)

जाहिरात
0306

स्टार्कनं मागील वर्षभरात प्रत्येक प्रकारात चांगली कामगिरी केली. त्यानं 5 टेस्टमध्ये 33.24 च्या सरासरीनं 17 विकेट्स घेतल्या. तर टी20 क्रिकेटमध्ये 23.08 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतल्या. (Mitchell Starc instagram)

जाहिरात
0406

स्टार्कच्यापूर्वी ग्लेन मॅकग्राथ, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन आणि सध्याचा कॅप्टन पॅट कमिन्स या फास्ट बॉलर्सनी हा पुरस्कार जिंकला आहे. (Mitchell Starc, instagram)

जाहिरात
0506

स्टार्कला यंदाचा सर्वश्रेष्ठ वन-डे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराा मानकरी ठरला आहे. विशेष म्हणजे त्याची पत्नी एलिसा हिली हिला सर्वश्रेष्ठ वन-डे महिला क्रिकेटपटू हा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Alyssa Healy instagram)

जाहिरात
0606

स्टार्कला या प्रकारात 15 मतं मिळाली. तर हिलीला 13 मतं पडली. हिलीला तिसऱ्यांदा सर्वश्रेष्ठ वन-डे क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. (Alyssa Healy instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या