JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / अमिताभ बच्चन यांना मागावी लागली सचिन तेंडुलकरची माफी!

अमिताभ बच्चन यांना मागावी लागली सचिन तेंडुलकरची माफी!

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बाबत एक चुकीचा व्हिडीओ प्रसिद्ध केल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना माफी मागावी लागली.

0106

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बाबत एक चुकीचा व्हिडीओ प्रसिद्ध केल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना माफी मागावी लागली. अमिताभ यांनी नंतर सुधारित व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.

जाहिरात
0206

अमिताभ बच्चन यांनी शनिवारी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये सचिन तेंडुलकर लीजेंड्स क्रिकेट लीग (Legends Cricket League) स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगितले होते. त्यावर सचिन ही स्पर्धा खेळणार नसल्याचे स्पष्टीकरण त्याच्या मॅनेजमेंटने दिले. त्यामुळे अमिताभ यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी तो व्हिडीओ डिलिट करत माफी मागितली. (Instagram)

जाहिरात
0306

सचिन लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC) स्पर्धेचा भाग नाही, असे सचिन तेंडुलकरची मॅनेजमेंट कंपनी 'एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' यांनी स्पष्ट केले. LLC मध्ये निवृत्त खेळाडू खेळतात (Instagram)

जाहिरात
0406

सचिन तेंडुलकर या स्पर्धेत खेळणार नाही. आयोजकांनी फॅन्स आणि अमिताभ बच्चन यांची दिशाभूल करणे टाळावे, असे स्पष्टीकरण 'एसआरटी स्पोर्ट्स' च्या अधिकृत प्रवक्त्याने दिले. (Twitter)

जाहिरात
0506

अमिताभ बच्चन यांनी नंतर नवा व्हिडीओ शेअर केला. 'लीजेंड्स लीग क्रिकेट 20' चा फायनल प्रोमो. कुणालाही त्रास झाला असेल तर माफी मागतो. ही अनावधानाने झालेली चूक होती,' असे ट्विट त्यांनी केले. (Twitter)

जाहिरात
0606

लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांचे निवृत्त झालेले क्रिकेटपटू खेळणार आहेत. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफी, जॉन्टी ऱ्होडस, केव्हिन पीटरसन, वासिम अक्रम, शोएब अख्तर या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. त्यांची इंडिया महाराजा, एशिया लॉयन्स आणि वर्ल्ड जायंट्स या टीममध्ये विभागणी केली जाईल. (Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या