JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IND-W vs PAK-W: स्मृती मंधना आता रोहित-विराटच्या क्लबमध्ये! तर हरमनप्रीतने धोनीला टाकले मागे

IND-W vs PAK-W: स्मृती मंधना आता रोहित-विराटच्या क्लबमध्ये! तर हरमनप्रीतने धोनीला टाकले मागे

Commonwealth Games 2022: स्मृती मंधनाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. भारताने पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले.

0108

स्मृती मंधनाच्या (Smriti Mandhana) नेतृत्वाखाली भारतीय महिला फलंदाजांनी राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तानने प्रथम खेळताना 99 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हे लक्ष्य 11.4 षटकात पूर्ण केले. (एपी)

जाहिरात
0208

मंधनाने तिच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक झळकावले. ती 42 चेंडूत 63 धावा करून नाबाद राहिली. म्हणजेच 150 च्या स्ट्राईक रेटने तिने ह्या धावा कुटल्या. या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. तिने केवळ चौकारावर 50 धावा केल्या. शेफाली वर्मासोबत तिने पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. (एपी)

जाहिरात
0308

यासह 26 वर्षीय स्मृती मंधनाने लक्ष्याचा पाठलाग करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. तिने 40 डावात 32 च्या सरासरीने 1059 धावा केल्या आहेत. यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये तिचा स्ट्राइक रेट 121 आहे. (एपी)

जाहिरात
0408

पुरुष क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर केवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा हे लक्ष्याचा पाठलाग करताना T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा करू शकले आहेत. म्हणजेच मंधना आता कोहली आणि रोहितच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. कोहलीने 40 डावात 1789 धावा केल्या असून रोहितने 57 डावात 1375 धावा केल्या आहेत. (एपी)

जाहिरात
0508

स्मृती मंधनाचा एकूण T20 आंतरराष्ट्रीय विक्रम पाहिला तर तिने आतापर्यंत 89 सामन्यांत 87 डावांत 27 च्या सरासरीने 2120 धावा केल्या आहेत. यात 15 अर्धशतकांचा समावेश आहे. यात 86 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. (एएफपी)

जाहिरात
0608

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार हरमनप्रीत कौरने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने 126 सामन्यांच्या 113 डावात 2463 धावा केल्या आहेत. यात तिने एका शतकासह 7 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर माजी कर्णधार मिताली राज दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने 89 सामन्यांत 84 डावात 2364 धावा केल्या आहेत. तिच्या नावावर 17 अर्धशतके आहेत.(Instagram)

जाहिरात
0708

कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरचा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा 42 वा विजय आहे. पुरुष किंवा महिला गटात भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणारी ती कर्णधार ठरली आहे. तिने एमएस धोनीला मागे टाकलं आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत 71 सामन्यांत 42 सामने जिंकले आहेत. 26 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे, तर 3 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. (एएफपी)

जाहिरात
0808

एमएस धोनीबद्दल बोलायचे तर, त्याने कर्णधार म्हणून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 72 पैकी 41 सामने जिंकले. तर 28 मध्ये पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली 30 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर तर रोहित शर्मा 27 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिला गटात मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून 32 पैकी 17 सामने जिंकले आहेत. ती हरमनप्रीतनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. (एएफपी)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या