JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पुजाराने शतकासह गाठला आणखी एक माइलस्टोन; गावस्कर, सचिन यांच्या क्लबमध्ये एन्ट्री

पुजाराने शतकासह गाठला आणखी एक माइलस्टोन; गावस्कर, सचिन यांच्या क्लबमध्ये एन्ट्री

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर चेतेश्वर पुजाराची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 7 जूनला ओवलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू होणार आहे.

जाहिरात

cheteshwar pujara in county cricket

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 06 मे : भारतीय कसोटी संघाची न्यू वॉल अशी ओळख असणारा चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. शुक्रवारी त्याने ससेक्सकडून खेळताना आणखी एक माईलस्टोन गाठला. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा पुजारा भारताचा सहावा फलंदाज आहे. कसोटीपटू अशी ओळख बनवलेल्या पुजाराने वॉरेस्टरशॉयरविरुद्ध पहिल्या डावात 189 चेंडूत 136 धावांची खेळी केली. ससेक्सचं नेतृत्व करणाऱ्या पुजाराने आपल्या या खेळीत 189 चेंडूत 19 चौकार आणि एक षटकार मारला. यासोबतच पुजाराने भारताचे लिटल मास्टर सुनील गावस्कर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वासिम जाफर यांच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. MI vs CSK सामन्यावर पावसाचे संकट; प्ले ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना   गावस्कर यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक 25 हजार 834 धावा केल्या आहेत. तर सचिनच्या नावावर 25 हजार 396 धावा आहेत. राहुल द्रविडने 23 हजार 794 आणि लक्ष्मणने 19 हजार 730 धावा केल्या आहेत. वासिम जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19 हजार 410 धावा केल्या आहेत. तर आता पुजाराच्या 19 हजार 43 धावा झाल्या आहेत. याआधी पुजाराने ग्लूस्टरशॉयरविरुद्ध सेकंड डिव्हिजन काउंटी चॅम्पियनशिपमध्येही शतक झळकावलं होतं. यंदाच्या हंगामातलं हे त्याचं तिसरं शतक आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराने वासिम जाफरच्या 57 शतकांचा विक्रमही मागे टाकला. चेतेश्वर पुजाराची 59 शतके झाली असून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीयांमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 81 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर चेतेश्वर पुजाराची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 7 जूनला ओवलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू होणार आहे. चेतेश्वर पुजारा 2022 पासून काउंटीमध्ये सलग खेळत असून धावांचा पाऊस पाडला आहे. यात त्याने 13 डावात 1094 धावा केल्या असून यामध्ये 5 शतकांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या