मेलबर्न, 10 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी बुशफायर क्रिकेट बॅश मॅच खेळण्यात आली. यामध्ये पाँटिंग इलेव्हन आणि गिलख्रिस्ट इलेव्हन यांच्यात सामना झाला. यात गिलख्रिस्टच्या संघाने विजय मिळवला. या सामन्यावेळी मॅथ्यू हेडनने बूट काढून गोलंदाजी केली. तर रिकि पाँटिंग एक चेंडू खेळण्यासाठी चक्क यष्टीरक्षकाच्या मागे धावला. रिकी पाँटिंगच्या संघाकडून खेळणाऱ्या मॅथ्यू हे़डनने 8 वे षटक टाकले. यावेळी हेडनने त्याचे बूट काढले आणि अनवाणी पायाने गोलंदाजी केली. हेडनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेडनने या षटकात 12 धावा दिल्या. अँड्र्यू सायमंड्सने त्याच्या षटकात दोन चौकार लगावले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने तर क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने न खेळलेला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. कर्टनी वॉल्श गोलंदाजी करत असताना चौथ्या चेंडूवेळी त्याच्या हातातून बॉल निसटला. हा चेंडू ऑफ साइडला बराच बाहेर पडला आणि स्लिपमध्ये असलेल्या खेळाडूकडे जात होता. यावेळी रिकी पाँटिंग चक्क स्टम्पच्या मागे जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा हा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला.
रिकी पाँटिंगच्या संघाने गिलख्रिस्टच्या संघाला एका धावेनं पराभूत केलं. दोन्ही संघांमध्ये 10-10 षटकांचा सामना झाला. यात पाँटिंग इलेव्हनने 10 षटकांत 104 धावा केल्या. यात ब्रायन लाराने 11 चेंडूत 30 धावा केल्या. पाँटिंगने 14 चेंडूत 26 तर हेडनने 14 चेंडूत 16 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना गिलख्रिस्टच्या संघाने 10 षटकात 103 धावा केल्या. त्यांच्या संघाकडून वॅटसनने 9 चेंडूत 30 धावा केल्या. VIDEO : ऑस्ट्रेलियाचं चॅलेंज स्वीकारत मास्टर-ब्लास्टर उतरला मैदानात