JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Brother’s Day 2022 : वॉ ते पांड्या 'या' भावांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान

Brother’s Day 2022 : वॉ ते पांड्या 'या' भावांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान

जगभरात 24 मे हा दिवस नॅशनल ब्रदर्स डे म्हणून साजरा केला जातो. क्रिकेटमध्येही भावांच्या जोडीनं एकत्र ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या भावांच्या काही सुपरहिट जोड्या आपण या निमित्तानं पाहूया

0108

मुंबई, 24 मे : जगभरात 24 मे हा दिवस नॅशनल ब्रदर्स डे म्हणून साजरा केला जातो. क्रिकेटमध्येही भावांच्या जोडीनं एकत्र ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या भावांच्या काही सुपरहिट जोड्या आपण या निमित्तानं पाहूया (फोटो - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0208

ऑस्ट्रेलियाची स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ ही जुळ्या भावांची जोडी क्रिकेट विश्वात चांगलीच प्रसिद्ध होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकत्र खेळणारे हे पहिले जुळे भाऊ आहेत. ऑस्ट्रेलियाचा 1999 चा वर्ल्ड कप जिंकण्यात स्टीव्ह वॉच्या कॅप्टनसीचा मोठा वाटा होता. तर आक्रमक बॅटर अशी मार्क वॉची ओळख होती.

जाहिरात
0308

युसूफ आणि इराफान पठाण या भावांनी भारतीय टीमकडून एकत्र क्रिकेट खेळलं. इराफाननं 2003 साली तर युसूफनं 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हे दोघंही आता निवृत्त झाले आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)

जाहिरात
0408

पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये कमरान अकमल आणि उमर अकमल या भावांचा एकेकाळी दबदबा होता. कमराननं 2002 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर उमरनं 2008 साली मलेशियात झालेला अंडर 19 वर्ल्ड कप गाजवला. या भावांची जोडी क्रिकेटच्या बाहेरील कारणांमुळेही अनेकदा चर्चेत असते. (फोटो - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0508

ऑस्ट्रेलियाकडून माईक हसी आणि डेव्हिड हसी या भावांनीही एकत्र क्रिकेट खेळलं. या दोघांनीही आयपीएल टीमचे कोच म्हणूनही काम केलं आहे.

जाहिरात
0608

टॉम करन आणि सॅम करन ही इंग्लंडकडून एकत्र खेळलेली सहावी भावांची जोडी आहे. हे दोघं भारताविरूद्धच्या वन-डे सीरिजमध्ये एकत्र खेळले होते. ( फोटो - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0708

शॉन मार्शनं ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट आणि वन-डेमध्ये प्रतिनिधत्व केलं आहे. तर मिचेल मार्शनं ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही प्रकारचं क्रिकेट खेळलं आहे. या भावांनी आयपीएल स्पर्धा देखील गाजवली आहे.

जाहिरात
0808

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या ही भावांची जोडी सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. त्यांनी टीम इंडियासह मुंबई इंडियन्समध्येही एकत्र क्रिकेट खेळले आहे. हार्दिक सध्या गुजरात टायटन्स या आयपीएल टीमचा कॅप्टन असून कृणाल लखनऊ सुपर जायंट्सचा सदस्य आहे. (फोटो - इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या