JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Ranji Trophy : भारतीय क्रिकेटपटूने ठोकलं लागोपाठ दुसरं शतक, मग मैदानात पत्नीसाठी झळकावलं लव्ह लेटर!

Ranji Trophy : भारतीय क्रिकेटपटूने ठोकलं लागोपाठ दुसरं शतक, मग मैदानात पत्नीसाठी झळकावलं लव्ह लेटर!

रणजी ट्रॉफीमध्ये पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारीचा (Manoj Tiwary Love Letter) धमाका सुरूच आहे. बंगालकडून खेळताना मनोज तिवारीने सेमी फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध शतक झळकावलं. क्वार्टर फायनलमध्ये शतकी खेळी केल्यानंतर मनोज तिवारीचं हे लागोपाठ दुसरं शतक आहे. शतक केल्यानंतर मनोज तिवारीने मैदानातच पत्सीसाठी लव्ह लेटर झळकावलं. त्याचं हे लव्ह लेटर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

0106

पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री आणि टीएमसी आमदार मनोज तिवारी रणजी ट्रॉफीच्या या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 36 वर्षांचा होऊनही मनोज तिवारीच्या खेळाता वयाचा परिणाम जाणवत नाही. क्वार्टर फायनलनंतर त्याने मध्य प्रदेशविरुद्ध सेमी फायनलमध्ये 102 रनची खेळी केली.

जाहिरात
0206

मनोज तिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधला यशस्वी खेळाडू आहे. तिवारीने मागच्याच आठवड्यात रणजी ट्रॉफी 2022 च्या क्वार्टर फायनलच्या दोन्ही इनिंगमध्ये 74 आणि 136 रनची खेळी केली होती. मनोज तिवारी सध्या बंगालच्या शिबपूरचा आमदार आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या काही महिने आधी त्याने टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याला मोठी जबाबदारी देत क्रीडा मंत्री केलं.

जाहिरात
0306

मंत्री झाल्यानंतरही मनोज तिवारीचं क्रिकेटबद्दलचं प्रेम कमी झालं नाही. मध्य प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं 29वं शतक ठोकलं. शतक केल्यानंतर त्याने पत्नी आणि कुटुंबाला धन्यवाद देणारं एक पत्र झळकावलं. या पत्रामध्ये मनोज तिवारीची पत्नी आणि कुटुंबातल्या सदस्यांची नावं होती आणि बदामाचं चित्र होतं. तिवारीने 129 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने 9200 रन केल्या आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये तो बंगालचा कर्णधारही होता.

जाहिरात
0406

मनोज तिवारीचा जन्म बंगालच्या हावडामध्ये झाला. फूटबॉलचा गड असलेल्या बंगालमध्ये सौरव गांगुलीनंतर मनोज तिवारीने क्रिकेटमधून बरीच लोकप्रियता मिळवली. मनोज तिवारीने भारताकडून 12 वनडे आणि 2 टी-20 मॅच खेलल्या. वनडेमध्ये त्याने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 287 रन केले. तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याला फक्त 15 रनच करता आल्या.

जाहिरात
0506

आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि रायजिंग पुणे सुपर जाएंट्सकडून खेळला आहे. त्याच्या नावावर 98 आयपीएल सामन्यांमध्ये 7 अर्धशतकांच्या मदतीने 1,695 रन आहेत.

जाहिरात
0606

मनोज तिवारीने उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या सुष्मिता रॉयसोबत लग्न केलं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार दोघं पहिल्यांदा 2006 साली भेटले होते. सात वर्ष डेटिंग केल्यानंतर जुलै 2013 साली दोघांनी लग्न केलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या