ब्रिस्बेन, 10 जानेवारी : भारतात ज्याप्रमाणे आयपीएल ही स्पर्धा चर्चेत असते, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग ही सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत एकापेक्षा एक असे अनेक प्रसंग घडत असतात. दरम्यान, या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूला त्याच्या पत्नीनं धमकी दिली आहे. बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीटने होबार्ट हरीकेंन्स या संघाला नमवत 5 विकेटनं विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या विजयात त्यांचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंगचा मोठा हात होता. या अष्टपैलू खेळाडूने कठीण प्रसंगी फलंदाजीला येत 29 चेंडूंत नाबाद 43 धावा केल्या. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कटिंगला सामनावीराचा पुरस्कार जाहीर झाला. आश्चर्यकारक गोष्ट अशी की सामन्यानंतर कटिंगला त्याची पत्नी एरिन हॉलंडने धमकी दिली होती. पत्नीने कटिंगला दिली धमकी! बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड एक टीव्ही प्रेजेंटर आहे. हा सामना संपल्यानंतर तिने आपल्या पतीशी चर्चा केली. सर्व प्रथम हॉलंडने त्याचे आभार मानले. बेन कटिंगशी बोलताना हॉलंडने, “आराम कर, पर्थमध्ये चांगले खेळा नाही तर घरी येऊ नका”. दरम्यान, पत्नीचे म्हणणे ऐकल्यानंतर कटिंग्ज हसण्यास सुरुवात केली आणि या दोघांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ब्रिस्बेन हीटला त्यांचा पुढील सामना पर्थमधील यजमान पर्थ स्कॉर्चर्सविरूद्ध खेळायचा आहे.
कोण एरिन हॉलंड बेन कटिंगची पत्नी एक टीव्ही होस्ट तसेच एक ब्युटी क्वीन, गायक, मॉडेल, नर्तक आहे. एरिनने हॉलंडने आयपीएल 2018 मध्ये देखील अँकर केले होते. एरिन हॉलंडने 2013 साली मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलियाचे विजेतेपद जिंकले आहे.
बेन कटिंग हा टी २० फॉर्मेटचा स्पेशालिस्ट खेळाडू मानला जातो, तो जगभर टी-20 लीगमध्ये खेळतो. मात्र, यावेळी त्याच्यावर आयपीएलमध्ये बोली लावण्यात आली नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून बेन कटिंगने 21 सामने खेळले आहेत. कटिंगने ऑस्ट्रेलियाकडून 4 एकदिवसीय सामने आणि 7 टी -20 सामने देखील खेळले आहेत.