वेलिंग्टन, 26 नोव्हेंबर : पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात 18 डिसेंबरापासून टी -20 आणि कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. मात्र या दौऱ्याआधी पाक संघातील 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. न्यूझीलंड क्रिकेटनं याबाबत बातमी दिली आहे. सध्या या सहाही खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. न्यूझीलंड क्रिकेटनं दिलेल्या माहितीनुसार, या सहाही खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले असून या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाही आहेत. तसेच सर्व खेळाडूंना आयसोलेशनमध्ये सराव करण्यास सांगण्यात आले आहे. याआधी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान फलंदाज फखर जमानमध्ये (Fakhar Zaman) करोनाची लक्षणं आढळली होती. त्यामुळे त्याला त्याला न्यूझीलंड दौऱ्यामधून वगळण्यात आलं होतं. पाकिस्तान संघ टी -20 आणि कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या दौर्यावर गेला आहे.
न्यूझीलंड संघानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाकिस्तान संघाच्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. यांपैकी दोन खेळाडूंचे रिपोर्ट याआधीच पॉझिटिव्ह आले होते. यात आता 4 रुग्णांची भर पडली आहे. न्यूझीलंडमध्ये पथकाच्या प्रवेशास कारणीभूत असलेल्या प्रोटोकॉलनुसार, सहा सदस्यांना क्वारंटाइन सुविधेच्या ठिकाणी हलविले जाईल.". न्यूझीलंड दौऱ्याआधी रवाना होण्याआधी पाकिस्तानी खेळाडूंनी चार वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र सर्व खेळाडू न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडूंचे रिपोर्ट आले. कोरोनाच्या काळात पाकिस्तान एकमेव संघ आहे, ज्यानं या संकटातही दुसरा विदेश दौरा केला आहे. याआधी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. दुसरीकडे 27 नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया सुरू होणार आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.