JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जय शहांनी काढली गांगुलीच्या संघाची 'विकेट', क्रिकेटच्या 'दादा'चा पराभव

जय शहांनी काढली गांगुलीच्या संघाची 'विकेट', क्रिकेटच्या 'दादा'चा पराभव

बीसीसीआय सेक्रेटरी जय शहा यांच्या नेतृत्वाखालील संघाने सौरव गांगुलीच्या प्रेसिडंट इलेव्हनचा पराभव केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) 89 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या एक दिवस आधी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर मंडळाच्या सदस्यांनी मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळला. यावेळी बीसीसीआय सेक्रेटरी जय शहा यांच्या नेतृत्वाखालील संघाने सौरव गांगुलीच्या प्रेसिडंट इलेव्हनचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना जय शहा यांच्या सेक्रेटरी इलेव्हन संघाने 12 षटकांमध्ये 128 धावा केल्या. सेक्रेटरी इलेव्हनकडून जयदेव शहा यांनी सर्वाधिक 38 धावा केल्या, तर सलामीवर मोहम्मद अझरुद्दीन यांनी 22 चेंडूंमध्ये 37 धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाची घसरगुंडी उडाली. मात्र सौरव गांगुलीने एकतर्फी लढत देत अर्धशतक ठोकलं. मात्र आपल्या संघाला तो विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि प्रेसिडंट इलेव्हनला 12 षटकांमध्ये फक्त 100 धावाच करता आल्या. सौरव गांगुलीने नाबाद 53 धावांची खेळी केली. या सामन्यात जय शहा यांची कामगिरी चर्चेचा विषय ठरली. कारण शहा यांनी 39 धावा देत 2 बळी घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या